‘पैसे भरा नाहीतर तुरुंगात जा’ सर्वोच्च न्यायालयाचा अनिल अंबांनी यांना दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ल्ली | रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांना सुप्रीम कोर्टाने एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर केलेल्या अवमाना प्रकरणी दोषी ठरविले आहे, या प्रकरणात ते तुरुंगात जाऊ शकतात. यात रिलियन्स ग्रुपच्या दोन संचालकांना देखील दोषी ठरवलं आहे.

एरिक्सन इंडियाने केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टने अनिल अंबानी आणि दोन संचालकांनी चार आठवड्यात एरिक्सन इंडियाला ४५३ कोटी रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत.वेळेत पैसे न दिल्यास तिघांना प्रत्येकी तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तिघांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.ही रक्कम एक महिन्यात जमा न केल्यास एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एरिक्सन इंडियाने आपले ५५० कोटी रिलायन्स काम्युनिकेशन्स लिमिटेड कडे बाकी असल्याचं याचिकेत म्हटलं होत. याचा निर्णय एरिक्सन इंडिया च्या बाजूने लागला आहे. अनिल अंबानींना व्याजासकट पैसे परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या प्रकरणात अनिल अंबानीं सोबत रिलायन्स टेलिकॉमचे चेअरमन सतीश सेठ आणि रिलायन्स इन्फ्राटेलचे चेअरमन छाया विराणी यांचा समावेश आहे.
रिलायन्स ग्रुपकडे राफेल विमान करारात गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहे, पण आमचे ५५० कोटी परत करण्यासाठी नाहीत.असा आरोप एरिक्सन इंडियाने केला होता. परंतु रिलायन्स कम्युनिकेशनची रिलायन्स जिओशी संपत्ती संदर्भात असलेली बोलणी फिस्कटल्याने आपण एरिक्सन इंडिया चे पैसे देऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त केली.

इतर महत्वाचे – 

अखेर ‘त्यांनी’ अण्णांची लेखी माफी मागितली

पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने होत असल्याने निषेध

या कारणामुळे उदयनराजे भोसले करणार नाहीत यंदा वाढदिवस साजरा…

Leave a Comment