आरटीईची थकीत रक्कम द्या; अन्यथा आंदोलन करू, इंग्रजी शाळा संघटनेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | आरटीई कायद्याअंतर्गत राज्यातील सर्व इंग्रजी शाळांनी गरीब व वंचित गटातील पालकांच्या पाल्यास वर्ष २०१२ -१३ पासून प्रतिवर्षी २५ टक्के मोफत प्रवेश दिलेले आहेत. त्यांची प्रतिपूर्तीची रक्कम केंद्र व राज्य सरकारने वर्षातून दोन टप्यात देणे बंधनकारक असताना तीन-चार वर्षांपासून दिलेली नाही जवळपास ५०० कोटीपेक्षा अधिक रक्कम थकित आहे. शासनाने केवळ ५० कोटींची तरतूद करून इंग्रजी शाळांचा अवमान करून खिल्ली उडवत असल्याचे इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने आंदोलन  करण्याचा पवित्रा घेणार आहे.

आधीच कोरोनाचे संकट त्यात पालकांकडे दोन वर्षांची लाखो रुपये फीस थकीत आहे. शिक्षणमंत्री सुद्धा पालकांना फी सक्ती करू नका; अन्यथा शाळांवर कारवाई करण्याबाबत स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करुन सातत्याने शिक्षण विभागामार्फत सांगितले जात आहे. दुसरीकडे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपाशी अध्यापन करीत असून, बसचालक, मदतनीस, लाईट बिल, मालमत्ता कर याची देणी मोठ्या प्रमाणात थकीत आहेत.

शाळेसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने देखील चिंता वाढली आहे. शासनाने लक्ष देऊन इंग्रजी शाळांच्या समस्या तातडीने दुर कराव्यात यासाठी राज्यातील विविध संघटनांनी आपापल्या स्तरावर आंदोलने देखील केली आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने  इंग्रजी शाळांतील प्रमुख डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करीत आहे.  काल विदर्भातील खोडा निवासी राम मिलन यादव यांनी आत्महत्या करण्याची घटना घडली असून इंग्रजी शाळा संचालकाचा चौथा बळी गेला असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी यामध्ये लक्ष घालून आरटीईची थकीत प्रतिपूर्ती मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विविध मागण्या शासनाकडून मंजूर करून घ्याव्यात; अशी मागणी केली असून आंदोलन केले जाईल, असे मेसा इंग्रजी शाळा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले.

तसेच लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व संघटना एकाच वेळी जनआंदोलन करण्याचे नियोजन करीत असल्याचे मेसा संघटने प्रविण आव्हाळे, ईसा संघटनेचे भारत भादंरगे,  मेस्कोचे गजानन वाळके,  सोलापूर मेस्टा ( एफ )चे हरिष शिंदे  तसेच नागेश जोशी, हनुमान भोंडवे, रत्नाकर फाळके, विश्वासराव दाभाडे , संजय पाटील, सुनील मगर, सचिन पवार, संतोष  सोनवणे नागपूरचे महेंद्र वैद्य आदींनी सांगितले असून राज्यातील सर्व इंग्रजी शाळा प्रमुखांनी संघटनेने हाक दिल्याबरोबर दिलेल्या नियोजनानुसार रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन सर्व इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment