हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) वापरणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्यावर आहे. रिकामा वेळ असला की स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकजण फेसबुक आणि इंस्टाग्राम चाळताना दिसतो. परंतु आता इथून पुढे फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यावर मर्यादा येणार आहे. कारण की, फेसबुकने युजर्सला झटका बसलेला एक मोठा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे फेसबूक म्हणजेच मेटा वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.
सध्या मेटाने हा नियम फक्त काही देशांमध्येच लागू केला आहे. मेटा कंपनीने सबस्क्रिप्शन आणले आहे. या सबस्क्रिप्शनचे शुल्क कमीच असणार आहे. यामध्ये फेसबुकसाठी सुमारे 540 रुपये तर इंस्टाग्रामसाठी 900 रुपये करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, कंपनीने युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. मेटा आपल्या ग्राहकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरते अशी माहिती समोर आली होती. परंतु, मेटाने डेटा ऍक्सेस करण्यास सक्षम नसल्याने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हे शुल्क अठरा वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या वापरकर्त्यांकडून घेण्यात येणार होते.
मेटाने घेतलेल्या या निर्णयामुळे फेसबुक वापरण्यासाठी युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांना पैसे भरावे लागणार आहेत. एक नंबर पासून सुरुवातीला 880 रुपये प्रति महिना युजरला द्यावे लागतील. यासह iOS आणि Android वापरकर्त्यांना 1,100 रुपये शुल्क भरावे लागेल. यामुळे फेसबुक वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.