1 एप्रिलपासून PayPal भारतात बंद करणार आपली सर्व्हिस

नवी दिल्ली । अमेरिकन ऑनलाइन कंपनी पेपल होल्डिंग्स इंकने (PayPal Holdings Inc) 1 एप्रिलपासून भारतात डोमेस्टिक पेमेंट सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कंपनीने ही माहिती दिली. कॅलिफोर्नियामधील सॅन जोस आधारित पेपल ही कंपनी आता क्रॉस बॉर्डर पेमेंट बिझनेसवर लक्ष देणार आहे. म्हणजेच ग्लोबल कस्टमर अद्यापही या सर्व्हिसचा वापर करून भारतीय व्यापाऱ्यांना पेमेंट देण्यास सक्षम असतील.

कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”1 एप्रिल 2021 पासून आम्ही आपले संपूर्ण लक्ष भारतीय व्यवसायांसाठी अधिक आंतरराष्ट्रीय विक्री सक्षम करण्यावर केंद्रित करू आणि भारतातील डोमेस्टिक प्रोडक्टपासून दूर राहू. याचा अर्थ असा की, आम्ही 1 एप्रिलपासून डोमेस्टिक पेमेंट सर्व्हिसेज देणार नाही.”

सध्या, पेपल हे ट्रॅव्हल आणि तिकीट सर्व्हिस मेकमायट्रिप, ऑनलाइन मूव्ही बुकिंग अ‍ॅप बुकमायशो आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगी यासारख्या अनेक भारतीय ऑनलाईन अ‍ॅप्सवर पेमेंटचा पर्याय देत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like