पेटीएमची झोमॅटोसह भागीदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | पेटीएम ह्या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज जाहीर केले की झोमॅटोशी त्यांनी भागीदारी केली आहे. याद्वारे ग्राहकांना ऑनलाइन फूड ऑर्डर करता येणार आहे. त्यामुळे पेटीएमचे युजर्स आता आपल्या अँपवर आवडत्या रेस्टॉरंट मधून खाद्यान्न ऑर्डर करु शकतील.

कंपनीने ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएम अँड्रॉइड अँपवर सक्रिय केली आहे. लवकरच ती देशभरात उपलब्ध केली जाणार आहे. तसेच सध्या फक्त अँड्रॉईडवर ही सेवा आयओएस अँपवरदेखील सक्रिय केली जाणार आहे.

देशातील द्वितीय व तृतीय श्रेणी शहरे महानगरांपेक्षा जोमाने विकसित होत आहेत. त्यामुळे त्या शहरांमधील डिजिटल वॉलेट वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे. पेटीएमचे सर्वाधिक वापरकर्तेसुद्धा द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्येच आहेत. यामुळे तग शहरांमधील झोमॅटोशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंटना या योजनेचा अधिक लाभ होणार आहे.

Leave a Comment