पेटीएमची एलआयसीसह धोरणात्मक भागीदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | विमा प्रीमियम पेमेंटचा पोर्टफोलिओ विस्तारत भारतातील डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहयोगामुळे, ग्राहक आता एक मिनिटापेक्षा कमी वेळात या मंचावरून एलआयसी प्रीमियम सहजपणे भरू शकतील.

हा मंच एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ, रिलायन्स लाईफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ, टाटा एआयए, एसबीआय लाईफ, आदित्य बिर्ला सन लाईफ, कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स, श्री राम लाईफ आणि स्टार हेल्थ सहित ३० पेक्षा जास्त विमा कंपन्यांचे प्रीमियम सहजगत्या ऑनलाइन भरण्यासाठीची सुविधा प्रदान करतो. ‘आपल्या देशात विम्याचे प्रीमियम सामान्यपणे ऑफलाइन पद्धतीने भरले जाते.

एलआयसी आणि इतर आघाडीच्या विमा प्रदात्या कंपन्यांशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे आमच्या लाखो वापरकर्त्यांना पेटीएम अ‍ॅपवरून पसंतीची पेमेंट पद्धत वापरुन आपली विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची सुलभ आणि वेगवान पद्धत उपलब्ध होईल.’, असे पेटीएमचे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले.

Leave a Comment