हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर (PDCC Bank Baramati) सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. रोहित पवार यांनी ट्विट करत पीडीसीसी बँक वेल्हा शाखा रात्रभर सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यांनी बँकेचे रात्रीचे फोटो शेअर केले होते. रोहित पवारांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल होते, PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय….आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे… कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर #ओव्हर_टाईम सुरू असावा…निवडणूक आयोग दिसतंय ना? पण सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल असं त्यांनी म्हंटल होते. रोहित पवार यांच्या ट्विट ची दखल घेत निवडणूक आयोग ऍक्शन मोड मध्ये आली.
#PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील #घड्याळ बहुतेक बंद पडलंय….
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे… कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर #ओव्हर_टाईम सुरू असावा…
निवडणूक आयोग दिसतंय ना?
सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल.@CEO_Maharashtra pic.twitter.com/3os8ALWv2v
बँक मॅनेजरवर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. बँक मॅनेजर या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल असता 40 ते 50 कर्मचारी आत आढळून आले. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.