Pear Farming | ‘या’ फळाच्या लागवडीतून मिळते लाखोंचे उत्पन्न, अनेक शेतकरी झाले मालामाल

Pear Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pear Farmingआजकाल शेतकरी शेतात वेगवेगळी पिके होतात. त्यात त्यांना फायदे देखील होत असतात. शेतकरी आजकाल फळांची देखील लागवड करत असतात. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा देखील होत असतो. यामध्ये पेरू, आंबा पपई, संत्री या फळांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जये. परंतु या हंगामी फळांमध्ये अशी काही फळ आहेत त्यातून देखील शेतकऱ्यांना फायदा होतो. ते फळ म्हणजे नाशपाती. (Pear Farming) या फळाबद्दल खूप कमी लोकांना माहीत असेल. पण या फळाने खूप आर्थिक फायदा होतो. आता आपण या फळाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नाशपतीचे शेतीमधून होतो लाखोंचा फायदा | Pear Farming

नाशपतीच्या फळाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना भरपूर लाभ होतो. कारण लोक नाशपतीची फळे खूप खातात आणि बाजारात देखील त्यांना खूप मागणी आहे. बाजारात ही फळे कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यामुळे लोक ती विकत घेतात. या फळामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो त्याचप्रमाणे पचनसंस्था ही सुरळीत होते. म्हणून डॉक्टर देखील हे फळ खाण्याचा सल्ला देतात. या नाशपतीच्या फळांमध्ये फायबर, जीवनसत्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. ही फळे खायला देखील गोड असतात. त्याचप्रमाणे या फळाचा वापर मिठाई बनवण्यासाठी देखील केला जातो.

या काळात लागवड करतात

मार्च ते एप्रिल या काळात नाशपतीचे (Pear Farming) फळ पिकवले जाते. हे फळ उच्च तापमानात तयार होते. या फळासाठी रासायनिक खतांचा त्याचप्रमाणे सेंद्रिय खतांचा देखील वापर केला जातो. हे फळ येण्यासाठी पिकाला नियमितपणे पाणी देणे गरजेचे असते. या पिकाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर तुम्ही एका एकरात 10 टन नाशपतीची फळ पिकवले तर यातून शेतकऱ्यांना जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचा नफा होतो.