‘या’ बँकेच्या खात्यात 1 मे पासून एवढे पैसे नसल्यास लागणार दंड

वृत्तसंस्था : तुम्ही जर ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकिंग एसएमएस शुल्कासह सरासरी मासिक शिल्लक मासिक रकमेतील आवश्यकते मध्ये बदल करण्याची घोषणा बँकेने केली आहे. याबाबत बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे. जुलै 2019 पासून ग्राहकांना एस एम एस सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेकडील प्रचार मेसेज आणि ओटीपी मेसेजचा यात समावेश नसेल.

ॲक्सिस बँकेने पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 मे 2021 पासून किमान सरासरी शिल्लक मर्यादा वाढवली आहे. ॲक्सिस बँकेने मेट्रो शहरांमध्ये बँकेच्या सुलभ बचत योजना असलेल्या खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम 10,000 रुपयांवरून आता 15,000रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ सर्व देशांतर्गत आणि एनआरआय ग्राहकांसाठी लागू असेल.

खात्यात किमान शिल्लक न राखणाऱ्या ग्राहकांना बँकेनं किमान दंड150 ते 50 रुपयांपर्यंत केला आहे. हे सर्व लोकेशन खात्यांसाठी लागू असेल. ग्रामीण भागात मुख्य खातेदारांना मासिक 15000 किंवा एक लाख रुपये मुदत ठेव रक्कम बंधनकारक होती. आता ही रक्कम मर्यादा 25000 रुपये मासिक करण्यात आली. तर लिबर्टी योजनेतील खातेदारांना आता 15,000 ऐवजी 25000 रुपये किंवा दरमहा 25 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या –

You might also like