गुड न्युज! लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार; ‘या’ वस्तू ऑर्डर करता येतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आपली सेवा बंद केली होती. मात्र, ग्राहकांसाठी एक गुड न्युज मिळत आहे. येत्या २० एप्रिल पासून ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं आता Amazon, Flipkart ई-कॉमर्स कंपन्यांना पुन्हा सेवा सुरू करण्यात येणार आहे.मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप, फ्रिज आणि अन्य वस्तू २० एप्रिलपासून ई कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याच्या लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

दरम्यान, या कंपन्यांच्या सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहं. बुधवारी जारी करण्यात आलेल्या नव्या सुचनेनुसार ठराविक कमर्शिअल आणि खासगी सेवांना लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात सुट देण्यात आली आहे. यापूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली होती. देशातील मोठ्या प्रमाणावर लोक ई-कॉमर्स कंपन्यांच्या लॉजिस्टीक आणि सामानांच्या पुरवठ्याच्या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. या क्षेत्राला परवानगी दिल्यानं या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वांना महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावं लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment