लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष नको..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | सुरभी गुप्ता

३३ वर्षाचे निखिल तनेजा सांगतात, “माझ्या आठवड्याचा शेवट खूप वाईट होता” मुंबई स्थित उद्योजक आणि उत्पादक सांगतात, “आठवडाभर जेव्हा मी घड्याळाकडे पाहतो तेव्हा माझ्याकडे काहीतरी असतं ज्यावर मी लक्ष केंद्रित असतो, पण आठवड्याच्या शेवटच्या काळात मात्र माझ्याकडे काहीच करण्यासारखे नसते तेव्हा मला खूप चिंता वाटते.” ते म्हणतात, “आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाता आणि लोकांना ते सगळं करताना पाहता जे त्यांना नेहमी करायचे होते, जसे की नवीन कौशल्ये शिकणे, जुने छंद पुन्हा नव्याने जोपासणे, एखादा ऑनलाईन कोर्स करणे वगैरे तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल आश्चर्य वाटायला लागते. जेव्हा तुम्ही विचार करता की घरी सगळे आहे, तेव्हा तुम्हाला काही हरवण्याची भीती नसते. तेव्हा अलगावची भीती येते.” तनेजा गेल्या तीन वर्षांपासून सामान्य चिंताग्रस्त अस्वस्थतेसह (Generalized Anxiety Disorder) झगडत आहेत, पण गेल्या एका महिन्यात ते अनेक पटींनी वाढले आहे. “जेव्हा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते, तेव्हा चिंता निर्माण होते आणि आपण एका साथीच्या आजाराच्या मध्यभागी आहोत, आजूबाजूला सर्वत्र अविश्वासनीयता निर्माण झाली आहे.” असे ते सांगतात. त्यांचे पालक बहरीन आणि भाऊ युनायटेड स्टेट्समध्ये असताना सातत्याने त्यांना covid-१९ च्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. ते म्हणतात, “मला माहित नाही केव्हा आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होणार आहे आणि कधी आम्ही सगळे पुन्हा भेटू शकणार आहोत.” 

तनेजा एकटे नाहीत, जेव्हापासून जग कोरोना विषाणूमुळे संकटात सापडले आहे आणि देशांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे, तेव्हापासून जगभरात मानसिक आरोग्याच्या समस्या उदयाला आल्या आहेत. “मानसिक आरोग्याच्या समस्या या covid-१९ शी समांतर सुरु असलेला एक साथीचा आजार आहे.” असे बेंगलोर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्स संस्थेच्या समूह मानसोपचार युनिटचे प्रमुख डॉ नवीन कुमार म्हणाले. भारतीय मानसोपचार सोसयटीला या उद्रेकानंतर मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांशी झगडणाऱ्या रुग्णांमध्ये अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी अलीकडेच घेतलेल्या सर्वेक्षणामधून या प्रकरणांमध्ये २०% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दर पाच भारतीयांच्या मागे एक भारतीय मानसिक अस्वस्थता आणि चिंतेशी झुंजतो आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात ‘निम्हान्स’च्या साहाय्याने एक मार्गदर्शिका जाहीर केली आहे, ज्यामध्ये अलगाव कसा हाताळावा आणि फेक न्यूज कशा टाळायच्या यासंदर्भात सल्ला दिला आहे. संस्थेने एका महिन्यापूर्वी एका मदतीसाठी संपर्कसुद्धा दिला आहे. तेव्हापासून जवळपास ११,००० कॉल आले आहेत.  देशभरातील २५० मानसिक आरोग्य तज्ञ हे कॉल स्वीकारत आहेत. सुरुवातीला लोक याला वैद्यकीय समस्या आणि तार्किक मुद्दे म्हणून व्यक्त करतात पण भय, घाबरून जाणे, चिंता आणि परिस्थितीबद्दल काळजी या येथील प्रमुख समस्या आहेत. डॉ कुमार सी म्हणाले, “जेव्हापासून बाह्यरुग्ण विभाग बंद आहे, तेव्हापासून लोकांना प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी देखील मदत मिळत नाही.” 

नेहमीच्या मदतकेंद्रांशिवाय टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) मुंबई, यांनी covid-१९ च्या दरम्यान समाज-मानसिक मदत पुरविण्यास सुरुवात केली आहे. “ही मदत मानसिक आरोग्य, कौटुंबिक हिंसाचार, घरगुती संघर्ष, अन्न मिळवणे किंवा प्रिस्क्रिप्शनशी संबंधित असू शकते. आमचे स्वयंसेवक तामिळ, मल्याळम, गुजराती आणि कोंकणीसोबत नऊ भाषांमध्ये बोलतात.” असे प्रकल्प समन्वयक, तनुजा बाबरे यांनी सांगितले. हा समूह दिवसभरात १०० कॉलना उत्तर देतो. या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्याच्या असमर्थतेचा परिणाम जगभरातील लोकांवर होतो आहे. जर्मनीच्या Hesse राज्याचे अर्थमंत्री Thomas Schaefer यांचा मृत्यू देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये झाला. covid-१९ चे पुढे जाऊन होणाऱ्या परिणामांमुळे अर्थव्यवस्था कोसळण्याच्या काळजीने त्यांनी एका महिन्यापूर्वी आत्महत्या केली.  भारतामध्ये आंध्रप्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यातील ५० वर्षीय व्यक्तीने अगदी देशात या प्रकरणांची नोंद होण्यास सुरुवात होण्यापूर्वी त्याला covid-१९ झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याचा फेब्रुवारीच्या सुरुवातीला जीव घेतला. दिल्लीमध्ये २३ वर्षांच्या व्यक्तीने मार्चमध्ये सफदरगंज रुग्णालयात मृत्यूसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारली. सिडनीवरून परत येत असताना विमानतळावर डोकेदुखीची तक्रार केली असता, त्यांना अलगाव विभागात दाखल करून विषाणूची चाचणी करण्यात आली होती. शेवटी त्यांचा अहवाल नकारात्मक आला. 

मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी पुन्हा या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आल्याची चिंता आणि काळजी वाटत असल्याची कबुली दिली आहे. “चिंता, अस्वस्थता, अनिवार्य वेडाची अस्वस्थता (obsessive compulsive disorder) आणि मानसिक अस्वस्थता असणाऱ्या लोकांसाठी नक्कीच खूप वाईट आहे. गंभीर चिंता असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप वाईट होईल या भीतीने जगणे खूप सामान्य आहे. या आजाराच्या उद्रेकाने केवळ त्यांची लक्षणे विस्तारित झाली आहेत. हे रुग्ण आता या भीतीमध्ये आहेत की एकतर त्यांना संक्रमण होईल किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना. “दिल्ली येथील मॅक्स आरोग्यसेवेच्या क्लीनिकल मानसशास्त्रज्ञ, अनुप्रिया सरकार म्हणाल्या. जग या संकटाला सामोरे जात असताना स्वतःच्या समस्या त्यांच्यासमोर व्यक्त करत असताना त्यांच्या काही रुग्णांनी खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मी त्यांना सांगते केवळ खूप मोठी समस्या आहे म्हणून त्यांना जे वाटते आहे ते अवैध ठरत नाही. दिल्लीच्या बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लामसलत मानसतज्ञ, डॉ श्वेतांक बन्सल म्हणाले, याचा काय परिणाम झाला, रुग्णांनी त्यांच्या प्रगतीच्या एक पाऊल मागे जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, “सामान्यतः उपचाराचा भाग म्हणून आम्ही आमच्या रुग्णांना अशा आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये त्यांचे नकारात्मक विचार जे ते त्यांच्यासाठी रंगवतात आणि वास्तववादी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतात अशा विचाराना प्रयत्नपूर्वक थांबविण्यास सांगतो. या आजाराच्या उद्रेकामुळे त्यांच्यासमोर खूप वाईट परिस्थिती आहे, आणि यामुळे त्यांच्या काळजीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच विशेषतः जीएडीच्या संदर्भात हे उपचार निष्फळ ठरतात. स्वच्छतेची सक्ती असलेल्या 
एखाद्याला व्यक्तीला “उद्भासन आणि प्रतिबंध प्रतिसाद” यासह सामान्य उपचार दिले जातात. रुग्णांना कृतीतून मुक्त ना होता पुन्हा स्वतःबद्दल विचार करण्यास शिकविले जाते. “आम्ही त्यांना हात न धुण्यास सांगतो. उदाहरणार्थ परिणामी चिंता सहन करतो. पण त्यांच्यासाठी आता आरोग्यशास्त्र आणि स्वच्छतेची सक्ती या दोन्हीमध्ये रेषा मारणे कठीण झाले आहे.” डॉ बन्सल म्हणाले. 

जेव्हा covid -१९ साथीचा आजार म्हणून घोषित करण्यात आला आणि वारंवार हात धुण्याची मार्गदर्शिका काढण्यात आली तेव्हा दिल्लीतील मानसशास्त्रज्ञ डॉ संजय छग यांना obsessive compulsive disorder च्या प्रकरणांमध्ये वाढ होईल हे अपेक्षितच होते. ते योग्य सिद्ध झाले. ते म्हणाले, जर कुणी दिवसातून वीस वेळा त्याचे हात धूत होता तो आता दिवसातून ५० ते १०० वेळा हात धुतो आहे. काही प्रकरणांमध्ये तर रुग्ण वॉशबेसिन 
पासून दुसरीकडे जायलाच तयार नाहीत.” त्यांच्या मते या उद्रेकामुळे obsessive compulsive disorder च्या रुग्णांचा त्यांच्या चिंता या खऱ्या ठरत असल्याचा समज आणखी दृढ झाला आहे. त्यांनी वेडेपणाचा मनोविकार (Paranoid Psychosis) असणाऱ्या एका रुग्णाचे उदाहरण दिले, ज्याची लक्षणे या साथीमुळे तीव्र झाली आहेत. त्यांनी सांगितले,  “त्याला असा भ्रम होतो आहे की लोक त्याला कोरोना विषाणूने संक्रमित करू पाहत आहेत.”  गेल्या काही वर्षांपासून दिवसभरात ३० वेळा हात धुणे ही  अभिषेक गुप्ता (नाव बदलले आहे) यांच्यासाठी एक नियमितता झाली आहे. “या साथीच्या आधीही मी एखाद्या अशा वस्तूला स्पर्श केला जी मला घाण वाटते तर हात धूत होतो, मग ते काहीही असो एखादी तेलकट वस्तू किंवा कपड्याचा तुकडा. मी अगदी जे लोक मला जे लोक स्वच्छ वाटायचे नाहीत त्यांच्यापासून खूप सामाजिक अंतर पाळायचो.” काही वर्षांपूर्वी 
obsessive compulsive disorder चे निदान झालेली ३२ वर्षीय व्यक्ती सांगते. अलीकडेच दिल्लीतील पॅरालिगलला सर्दी झाली, त्याने अत्यंत भीतीने त्यावर मात केली. त्यांनी सांगितले “मी २४ तासात काय काय केले त्या सगळ्याचा विचार केला, मला आठवले मी लाईची (लाईची नावाचे फळ)चा रस एका दुकानातून बांधून आणला होता. ज्याच्याकडून मी कधीच आणत नाही, पण यावेळेस आजूबाजूची सगळी दुकाने बंद असल्याने मी टाळू शकलो नाही.” तिथून तो मागे जाऊन विचार करू लागला, तो म्हणाला “मला खूप चिंता वाटायला लागली, जर ते चीन मधून पॅकबंद होऊन आले असेल तर, म्हणून त्याच्यामुळे मला संक्रमण झाले होते.  मी फार काळ वाट बघू शकलो नाही, दुकानात जाऊन दुसरे पॅकेट घेऊन आलो म्हणजे मला इतर तपशील तपासता येऊ शकले असते.शेवटी मला तो लाईची रस भारतात ओडिसा आणि उत्तरप्रदेशमध्ये पॅकबंद केल्याचे सापडले. मला मी मूर्ख असल्याचे वाटले पण त्यावेळी इतर काही कामाचे नव्हते.”  

खूपशा लोकांना त्यांच्या नियमित कामाच्या स्वरूपाचा आराखडा दरदिवसासाठी दिला जातो. पण आता संचारबंदीमुळे आराखडा नसल्याने लोकांना अडचणीचे वाटते. बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास होतो आहे. संचारबंदीच्या आर्थिक घसरणीचा सुद्धा बऱ्याच जणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, आणि केवळ पूर्वीपासून पीडित असणाऱ्या लोकांवरच नाही तर ज्या लोकांचा अशा कोणत्याच प्रकारचा वैद्यकीय इतिहास नाही अशा लोकांवर सुद्धा याचे परिणाम होत आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक निधी यांनी अलीकडेच या साथीमुळे जागतिक मंदीवर २००८ मध्ये झाला होता त्यापेक्षाही खूप वाईट परिणाम होणार असल्याचे घोषित केले आहे. पगारातील कपात आणि ताळेबंदीची खूप जणांना काळजी वाटते आहे. तनेजा जे ऑनलाईन कन्टेंट निर्मितीचे व्यासपीठ युवाचे काम करतात, त्यांनाही त्यांच्या व्यवसायाच्या भविष्याची काळजी वाटते आहे. ते म्हणतात, “सर्व सुरु असणारे संवाद बंद झाले आहेत, कोणत्याच कंपनीला त्यांना त्यांचे पैसे आता का खर्च करायचे आहेत याची कल्पना नाही.” 

२४ मार्चला जेव्हा देशव्यापी संचारबंदी जाहीर झाली, तेव्हा बऱ्याच मानसिक व्यावसायिकांनी त्यांची सत्रे ऑनलाईन सुरु केली. काहींनी समूह सत्र सुरु केली ज्यामुळे लोकांना एकमेकांना मदत करता येऊ शकेल. दिल्लीतील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ 
नुपूर डी पैवा सांगतात, “तुम्ही लोकांच्या चिंतेचे प्रमाण व्हाट्स अप समूहांवरून घेऊ शकता. साखळीने एकच संदेश पुढे पाठवून लोक त्यांच्या चिंता कमी करत आहेत, पण परत खूप जास्त चिंता पसरवली जाऊन ते स्वतःलाच खाद्य देत आहेत.”  बाबरे यांनी सांगितले टीआयआयएस मधील मदतकेंद्राच्या कॉलचे  स्वरूप संचारबंदीनंतर बदलले आहे. त्या म्हणाल्या, “सुरवातीची भीती आणि काळजी आता अतिदक्षतेशी संबंधित मिळालेल्या बातम्यांमध्ये विकसित झाली आहे.”  तनेजा त्यांच्या सल्लागाराच्या सल्ल्यावर सांगतात, “रोज सकाळी मी पहिल्यांदा वर्तमानपत्र वाचत होते, पण ती सवय सुरु ठेवणे खूप अवघड झाले आहे, कारण गोष्टी खूप लवकर बदलत आहेत.”  ते आता दिवसातील केवळ ३० मिनिटे बातम्या वाचतात. यामुळे त्यांना बातम्यांच्या चक्रामुळे वाटणाऱ्या चिंतेशी यशस्वी झुंज द्यायला मदत होते आहे. त्यांनी त्यांचा स्क्रीनचा वेळ ही  कमी केला आहे. ते सांगतात, “सतत ऑनलाईन  राहण्याचा थकवा येऊ लागल्याने फोनशी संबंधित नसलेल्या लिखाण आणि वाचन या कियांवर मी भर दिला आहे.” डॉ बन्सल सांगतात, सोशल मीडियापेक्षा  विश्वासार्ह बातम्यांवर अवलंबून राहणे महत्वाचे आहे.  ते त्यांच्या रुग्णांना दिवसाचा आराखडा देऊन सल्ला देत आहेत. ज्यामध्ये कार्यलयीन  नियमितता दिली आहे उदाहरणार्थ अगदी ते कमी तासात झाले तरी. ते सांगतात, “याची आपली झोपेची आणि अन्न साखळी नियमनासाठी मदत होते.” एकटे राहणाऱ्या लोकांसाठी भावनिक समर्थन व्यवस्थेच्या अभावामुळे विशेषतः कठीण झाले आहे. बेंगलोर स्थित, २९ वर्षीय अभिरक्षक, रिद्धी दोषी (नाव बदलले आहे) संचारबंदीच्या काळात संवेदना हरवण्यासंदर्भात बोलतात. त्या म्हणतात, “शेवटच्या आठवड्याच्या शेवटी मी Gilmore Girls सलग २१ तास बघून संपवले. मी केवळ पाणी प्यायला आणि माझ्या मांजरांना खायला द्यायलाच उठले होते. खूप मुश्कीलीने काहीतरी शारीरिक क्रिया केली असेल कोणत्याच उत्तरदायित्वाची संवेदना नव्हती. अलीकडेच माझे ब्रेकअप झाले होते आणि माझ्या कंपनीने पगार कपात घोषित केली आहे. आम्हाला त्याची व्याप्ती देखील सांगितली नाही. बॉसने एकदाही आमच्यासोबत कोणत्याच क्रियाशील नियोजनाची चर्चा केली नाही किंवा तपासणीही  केली नाही. कधी कधी मला वाटते माझ्या डोक्याचा स्फोट होईल.”

कुटुंबासोबत राहणाऱ्यांच्या त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. नोएडास्थित दिव्या पराशर नोंद करतात, जशी कुटुंबे घरीच आहेत तसे संघर्ष वाढले आहेत. “अचानक प्रत्येकजण एकमेकांच्या स्पेसमध्ये आले आहेत. वडिलांना पालकत्व हाताळण्याच्या काही कल्पनाच नाहीत, संवाद तुटतो आहे.” त्या सांगतात, “ज्यांना सामाजिक जीवनाची सवय झाली होती त्यांना या खंडाशी कसा व्यवहार करायचा हे माहित नाही. लोकांना आर्थिक प्रतिकूल प्रतिक्रियांचीही काळजी वाटते आहे.” दरम्यान संचारबंदीमधील मध्यमार्ग म्हणून लोक काहीतरी उत्पादक करण्यावर खोल लक्ष केंद्रित करीत आहेत. जे काम करायला एक दिवस लागत होता त्यासाठी आता दिन दिवस लागत आहेत. काहींना काम केल्यासारखेच वाटत नाही असे ते सांगतात. दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही जे केलं नाही त्याच्याकडे पाहता तेव्हा अपराध्यासारखे वाटते. तनेजा उत्पादकतेच्या गोष्टीला काळजी संबोधत आहेत. “लोकांमध्ये आमच्याकडे जास्त वेळ आहे, आम्ही जास्त काम करू शकतो अशा संवेदना निर्माण झाल्या आहेत. प्रत्येकाने या उन्हाळ्याच्या सुट्ट्या नसून एक संकट आहे हे जाणले पाहिजे.” असे ते म्हणतात. 

तथापि संचारबंदीची सकारात्मक बाजूदेखील आहे. “काही लोक त्यांना कसे पुनरुज्जीवित झाल्यासारखे वाटत आहे त्याबद्दल बोलत होते. त्यांच्या नोकऱ्या खूप तणावपूर्ण आहेत आणि त्यांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. पण आता जेव्हा ते घरातून काम करत आहेत तेव्हा त्यांना यापूर्वी किती अस्वस्थतेत काम करावे लागायचे हे जाणवते आहे.” चेन्नईस्थित समुपदेशक महानंदा बोहिदर सांगतात. बेंगलोर स्थित Hank Nunn Institute, a not profit mental health organization च्या मानसशास्त्रज्ञ ईशानी बडियाल सांगतात, असे बरेच जण ज्यांना अगोदर उपचार घेण्यासाठी किंवा शोधण्यासाठी वेळ नव्हता ते आता थोड्याशा गोंधळलेल्या अवस्थेनेही पोहोचत आहेत. सरकार म्हणतात, त्या त्यांच्या रुग्णांना काळजी करण्याच्या वेळेचा एक भाग दिवसभरातील एका वेळेसाठी बाजूला काढून ठेवा. अगदी ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या नाहीत त्यांसहित  सर्वांसाठीच ही खूप कठीण वेळ असल्याचे बोहीदर कबूल करतात. त्या त्यांच्या रुग्णांना रोजच्या नियमिततेत थोडे सौम्य क्षण जसे की घरातून काम करण्याच्या दिवशी विशिष्ठ कार्यक्रमांसाठी वापरणारा परफ्युम लावणे किंवा शाळा, महाविद्यालयातील  आवडत्या गाण्यांची एखादी यादी बनविणे सारख्या क्षणांना समाविष्ट करण्याचा आग्रह करतात.  “मी माझ्या रुग्णांना असेही सांगते जर तुम्ही काहीच करत नसाल आणि केवळ संचारबंदीमध्ये जगण्याचा प्रयत्न करीत आहात तरी ठीक आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, काही गोष्टी न केल्याबद्दल तुम्ही स्वतःला जज करता कामा नये.” असे त्या म्हणतात.

सुरभी गुप्ता यांच्या ‘द इंडियन एक्सप्रेस’मधील रविवारच्या पुरवणीतील लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

Leave a Comment