इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात; गुप्तचर विभागाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. ३ तारखेनंतर मनसे नेत्यांकडून आक्रमक पवित्र घेतला जाऊ शकतो त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली असून पोलिसांनी मनसे नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. त्यातच आता इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हंटल की, महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करण्याचे काम सुरू आहे. राज्याबाहेरील काही लोकाना इथे आणून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेरून लोक आणून महाराष्ट्रात अस्थिरता आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. महाराष्ट्रात अल्टिमेटमचं राजकारण चालणार नाही, इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल.” असं त्यांनी म्हंटल