लोकांना भाजपचे ठोस सरकार पाहिजे, ते लवकरच येईल

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

सातारा | महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार येईल. पंढरपूर -मंगळवेढा ही जागा जिंकून 106 जागा भाजपच्या होतील, लोकांना ठोस सरकार पाहिजे ते लवकरच येईल, असे वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

फलटण- लोणंद- पुणे या मार्गावरील रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार कुरघोड्या करण्यामुळे जाईल. त्यासाठी भाजपाला काही करण्याची गरज नाही. सध्या १०५ आकडा आमच्याकडे असून, पंढरपूर मंगळवेढा ची जागा जिंकून 106 जागा भाजपा घेईल व सरकार स्थापन करेल.

राज्याला भाजप सरकार हा एकच चांगला पर्याय आहे. आम्ही काहीच न करता महाविकास आघाडीचे सरकार जाईल. लोकांची इच्छा आहे, आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होईल, असं माला वाटतं असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

You might also like