हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल वापरणे ही प्रत्येक माणसाची गरज झालेली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाईल वापरत असतो. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. अगदी आपण एका ठिकाणावर बसून अनेक कामे करू शकतो. परंतु हा मोबाईल आपल्या जितक्या फायद्याचा आहे. तितकेच यामुळे आपल्याला धोके देखील निर्माण झालेले आहेत. मोबाईल हा आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. परंतु एका संशोधनातून अशी माहिती समोर आलेली आहे की, जे लोक जास्त मोबाईल वापरतात. त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका देखील वाढलेला आहे.
संशोधनात केलेल्या माहितीनुसार जर तुम्ही सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त मोबाईल मोबाईलचा वापर करत असाल, तर हृदयविकाराचा धोक्या येण्याची शक्यता दाट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पाच मिनिटांपासून ते 29 मिनिटापर्यंत मोबाईलचा वापर केला, तर हृदय विकाराच्या झटकांची शक्यता 3 टक्क्यांनी संभाव्य आहे. असे संशोधनात समोर आलेले आहे.
ब्रिटनमध्ये 4 लाख 44 हजार सत्तावीस लोकांची चाचणी करण्यात आली. त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. अनेक लोकांना मोबाईलच्या वापराआधी एकालाही रक्तदाबाचा त्रास नव्हता. परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरू झालेला आहे. अनेक जणांना 12.3 वर्षात हृदयविकाराचा त्रास सुरू झालेला आहे. तसेच हार्ट अटॅक आलेला आहे. अनेक लोकांचा मृत्यू देखील आलेला आहे. त्यामुळे मोबाईल आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे तितकाच हानिकारक देखील आहे.
हृदयविकाराचा झटका येण्याची इतर कारणे
मधुमेह आणि धूम्रपान – ज्याप्रमाणे मोबाईलचा वापर करणाऱ्या हृदय विकाराचा धोका येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मधुमेह किंवा धूम्रपण करत असणाऱ्या लोकांना देखील हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
मानसिक तणाव कमी झोप – जे लोक खूप कमी झोपतात. तसेच मानसिक तणाव घेतात. त्या लोकांना देखील मोबाईलच्या आदी वापरामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मोबाईलचा वापर कसा आणि किती करावा याबाबत जागरूकता असणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागेल.