लोकप्रतिनिधींनी राज्य सरकार निर्णय घेईल त्याप्रमाणे वागावं ः गृहराज्यमंत्री

शंभूराज देसाई यांचा छ. उदयनराजेंना सल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खासदार उदयनराजे हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनाही लोकांच्या आरोग्याची काळजी असणं गरजेचं, कोरोनाची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याप्रमाणे वागणं गरजेचं असल्याचा सल्ला उदयनराजेना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सायंकाळी कराड शहराला भेट दिली. कराड शहरातील कोल्हापूर नाका, दत्त चौक, कृष्णा नाका या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. लॉकडाऊनबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी पोलिस उपअधिकक्षक डाॅ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे आदी उपस्थित होते.

राज्यभरात सर्वत्र कडक लॉकडाऊन पाळला गेला आहे. राज्य सरकारच्या वीकेंड लाॅकडाऊनला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन तंतोतंत पालन होत आहे. राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. व्यापारी संघटनांनी निवेदन दिली आहेत. राज्य सरकार जी नियमावली ठरवेल त्यांच पालनं करणे. सर्व लोकप्रतिनिधीचं आणि नागरिकांच कर्तव्य आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like