कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने आत्महत्या केली आहे. पण जर आपण आत्महत्या केली तर कर्जदार कर्जासाठी भावामागे तगादा लावतील या काळजीपोटी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचीही गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये घडली आहे. दोन भावांमधील अनोखे प्रेम पाहून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवणे शक्य नसल्याची जाणीव झाल्यानंतर अनेक दिवस विचाराधिन असलेल्या प्रेमशंकरने आपला धाकटा भाऊ प्रेमचंद याला गोळ्या घालून स्वतः आत्महत्या केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
प्रेमशंकर आणि प्रेमचंद हे दोन भाऊ एकत्र राहत होते.त्यापैकी प्रेमचंद अविवाहित होता तर प्रेमशंकरचे लग्न झाले होते. आणि त्याला दोन मुलेदेखील आहेत. प्रेमशंकर याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्याच्या थोरल्या मुलाला झालेल्या एका गंभीर आजावर उपचार करण्यासाठी त्याने स्थानिक ओळखीच्या व्यक्तीकडून 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून मुलगा बरा झाला, पण प्रेमशंकरला ते कर्ज फेडणे शक्य होईना त्यातून त्याचा तणाव वाढत गेला आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

मात्र आपल्या मृत्युनंतर आपल्या धाकट्या भावाला कर्जासाठी विनाकारण त्रास दिला जाईल, असे वाटल्यामुळे त्याने गाढ झोपेत असणाऱ्या स्वतःच्या भावाची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळ्यांचे आवाज ऐकून शेजारी धावत घरी आले. तेव्हा प्रेमचंदचा मृत्यू झाला होता, तर प्रेमशंकर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून देशी कट्टा आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीवरूनच पोलिसांना घटनेचा उलगडा झाला आहे.

Leave a Comment