हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
काही दिवसांपासून परवेज मुशर्रफ यांची प्रकृती खालावली होती. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परवेज मुशर्रफ हे 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या आर्मी प्रमुखाचीही जबाबदारी पार पाडली होती. भारताविरोधात झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांनाच जबाबदार घराण्यात आले होते.
1999 साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना पाकि्स्तानी सैन्याला भारताकडून पराभूत व्हावे लागले होते. यावरुन तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि मुशर्रफ यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1999 साली नवाझ शरीफ यांनी मुशर्रफ यांना लष्करप्रमुख पदावरुन हटवले होते.