औरंगाबाद : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आज मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात ही पुनर्विचार याचिका असून यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 54 मुद्दे टाकलेले आहेत.मराठा आरक्षण 50% मर्यादेला आव्हान केले असून मागासवर्गीय आयोगाचा पुनर्विचार करण्याची मागणी देखील या याचिकेत केली आहे.
याबाबदल सविस्तर माहिती विनोद पाटील यांनी एका व्हिडिओ द्वारे दिली आहे. त्यात ते बोलताना म्हणाले की, ” मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावेळी केंद्र आणि राज्य सरकाने हे आरक्षण टिकेल अशी भूमिका घ्यावी.”
दरम्यान, गेल्या ५ जूनला मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्यानंतर मराठा समाजात निराशाजनक वातावरण निर्माण झाले होते. आज पुनर्विचार याचिका दाखल केल्यामुळे आरक्षण मिळण्याची नवीन आशा मराठा समाजातील लोकांमध्ये पल्लवित झाली आहे.