पेट्रोल- डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ; पहा आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल 80 पैसे तर डीझेलच्या दरात 70 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाप बसला आहे.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत 115.04 रुपये प्रति लिटर आहे तर डीझेल 99.25 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 100.21 रुपये लिटर असून डीझेल 91.47 रुपये प्रति लिटर आहे.

रशिया- युक्रेन युद्धा नंतर इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम पेट्रोल- डीझेल वाढीवर झाला आहे. मागील जवळपास आठ दिवसांत इंधन दर 4 रुपयांहून अधिक वाढला आहे. आगामी काळात या किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.