Petrol Diesel Price Cut Soon : पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार!! केंद्रीय मंत्र्यांनी दिली खुषखबर

Petrol Diesel Price Cut Soon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Petrol Diesel Price Cut Soon। पेट्रोल – डिझेलच्या किमतीबाबत एक दिलासादायक बातमी आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. भारताने ऊर्जा आयात धोरणात केलेला बदल आणि नवीन पुरवठा स्रोतांकडे वाढता कल या २ कारणांमुळें कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन पेट्रो आणि डिझेलचे दर कमी होतील. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबद्दलची खुशखबर दिली आहे.

कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ- Petrol Diesel Price Cut Soon

हरदीप सिंग पुरी म्हणाले, जर पुढील दोन-तीन महिने कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर राहिल्या तर भारतात इंधनाच्या किमती कमी करण्याची (Petrol Diesel Price Cut Soon)संधी आहे. नवीन स्रोत उदयास येत असल्याने तेलाच्या किमती कमी होतील. भारताने, कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ केली आहे.आधी २७ देशातून कच्चे तेल आयात करत होते. आता ४० देशांमधून निर्यात केली जाईल.या विविधीकरणामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत तर होईलच, याशिवाय जागतिक भू-राजकीय दबावांमध्ये भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा मिळेल. याचा फायदा शेवटी सामान्य ग्राहकांना होईल अशी अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले, जगातील तेल बाजारातील वाढीपैकी 16 टक्के वाढ भारतातून झाली आहे आणि येत्या काळात हा आकडा 25 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच, भारत केवळ ग्राहक बनत नाही, तर जागतिक ऊर्जा बाजाराला दिशा देणारा देश देखील बनत आहे. Petrol Diesel Price Cut Soon

दरम्यान, अलीकडेच, अमेरिकेने रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंधांचा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना हरदीप सिंग पुरी यांनी एक मोठे विधान केले. जागतिक तेल उत्पादनात रशियाचा वाटा १० टक्के आहे. जर रशियाला तेल व्यापारातून वगळले असते तर किंमती प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या असत्या. तुर्की, चीन, ब्राझील आणि युरोपियन युनियननेही रशियाकडून तेल आणि वायू खरेदी केला आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने जागतिक किमती स्थिर ठेवण्यातही मदत झाली असल्याचा दावा हरदीप सिंग पुरी यांनी केला.