Friday, January 27, 2023

उत्पादन शुल्क वाढवल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आजपासून वाढ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे आज जाहीर झाला. या निर्णयानंतर सामान्य नागरिकांसोबत राजकारणी लोकांनीही नाराजी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१२ साली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ कारणावरुन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर टीकेची चांगलीच झोड उठवली होती. याचाच दाखला आता नेटिझन्स देऊ लागले आहेत.

WhatsApp Image 2020-03-14 at 12.41.17 PM

- Advertisement -

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या निर्णयानंतर सरकार चालवणं जमत नसेल तर सोडून द्या अशा आशयाचं ट्विट करत स्वपक्षीयांनाच घरचा आहेर दिला आहे. एका नामांकित पत्रकाराने त्यांचंच ट्विट पुढे करत या निर्णयावर स्वपक्षीय नेतेही नाराज असल्याचं दाखवून दिलं आहे. दिल्ली आणि गोवा राज्यामध्ये पेट्रोलचे दर कमी असताना केंद्र सरकार आणखी उत्पादन शुल्क वाढवून नक्की काय साध्य करतंय हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.

WhatsApp Image 2020-03-14 at 12.42.15 PM