पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी, आपला शहराचे दर येथे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनेक दिवस सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत गेल्या. मात्र गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर राहिल्यामुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे. तेलाचे दर स्थिर राहण्याचे कारण म्हणजे कच्च्या तेलाची किंमत 17 वर्षाच्या नीचांकावर पोहोचणे आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनी आयओसीने आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आहे. तर त्याचवेळी एक लिटर डिझेलसाठी ते 80.53 रुपये इतके आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या.
दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 80.53 रुपये लिटर आहे.
मुंबई – पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 78.83 रुपये आहे.
कोलकाता – पेट्रोल 82.10 रुपये तर डिझेल 75.64 रुपये आहे.
चेन्नई – पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेलची किंमत 77.72 रुपये आहे.
नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 72.59 रुपये आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 72.77 रुपये आहे.
लखनऊ – पेट्रोल 80.98 रुपये तर डिझेल 72.49 रुपये आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.40 रुपये आहे.
भोपाळ- पेट्रोल 88.08 रुपये तर डिझेल 79.95 रुपये आहे.
जयपूर- पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 81.32 रुपये आहे.
चंदीगड – पेट्रोल 77.41 रुपये आणि डिझेल 71.98 रुपये आहे.

दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बदलतात. नवीन दर हे रोज सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलरचे कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर हे एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलचे कस्टमर RSP लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल कस्टमर RSP लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment