व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Petrol Diesel Price: आज आपल्या शहरातील 1 लिटर पेट्रोल डिझेलची किंमत काय आहे, ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) गुरुवारीही कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, सलग 28 व्या दिवशीही इंधनाचे दर (Petrol-Diesel Price) सारखेच आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे होणार्‍या आर्थिक संकटामुळे आणि त्यानंतरच्या महसुलावर दबाव वाढल्यामुळे केंद्र पुन्हा पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवू शकेल. कोविड १९ संबंधित अडथळा टाळण्यासाठी सरकारने अतिरिक्त आर्थिक सुधारणांच्या पॅकेजसाठी अर्थसहाय्य वाढवण्याची गरज भासल्यास पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात लवकरच प्रतिलिटर 3-6 रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सूचित केले आहे.

ऑक्टोबरच्या सुरूवातीस पाहिले तर, पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्येही परिस्थिती तशीच राहिली. मात्र, ऑगस्टमध्ये पेट्रोल आणि जुलै महिन्यात डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली.

आज आपल्या शहरात 1 लिटर पेट्रोलची किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
दिल्ली – 81.06
मुंबई – 87.74
चेन्नई – 84.14
कोलकाता – 82.59
नोएडा – 81.58

आज आपल्या शहरात 1 लिटर डिझेलची किंमत काय ते जाणून घेऊया-
दिल्ली – 70.46
मुंबई – 76.86
चेन्नई – 75.95
कोलकाता – 73.99
नोएडा – 71.00

AEI अहवालात दिली गेली माहिती
अमेरिकन ऊर्जा माहिती प्रशासन (AEI) च्या अहवालात असे म्हटले आहे की, पुढील महिन्यात 7 मोठ्या शेल फॉर्मेशन्समध्ये तेलाच्या उत्पादनात 1,21,000 बॅरलची घट होईल. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. तथापि, देशांतर्गत बाजारात सध्या पेट्रोकेमिकल्सच्या किंमतीवर त्याचा परिणाम होणार नाही.

अशाप्रकारे, दररोज पेट्रोल-डिझेलची किंमत तपासा
पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहित होऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंप कोड लिहून 9292992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

https://t.co/rMZREydAG5?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.