Petrol Diesel Price: भोपाळात पेट्रोल-डिझेलने 100 रुपये लिटरचा विक्रम केला, आपल्या शहरातील आजच्या किंमती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीनी (Petrol-Diesel Price Today) सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्या गेल्या एका आठवड्यात इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ करीत आहेत. आजच्या वाढीनंतर इंधनाचे दर देशातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरात एक्सपी पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे, तर अनेक शहरांमध्ये ती प्रतिलिटर 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. येथे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात त्यांचे दर खाली येण्याची शक्यता नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलामध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून आली. सोमवारी लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये ट्रेड सुरू असताना डब्ल्यूटीआय क्रूड 0.69 डॉलरने वाढून 60.16 डॉलर प्रति बॅरल झाला. ब्रेंट क्रूडची किंमतही वेगाने वाढत आहे. तो प्रति बॅरल 0.87 डॉलर वाढून 63.30 डॉलर प्रति बॅरल झाला.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये तर डिझेल प्रति लिटर 79.70 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 95.75 रुपये तर डिझेल प्रति लिटर 86.72 रुपये आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 90.54 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 83.29 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 91.45 रुपये तर डिझेल 84.77 रुपये प्रति लिटर आहे.
>> बेंगळुरूमध्ये पेट्रोल 92.88 रुपये आणि डिझेल 84.49 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळमध्ये पेट्रोल 97.27 आणि डिझेल 87.88 रुपये प्रतिलिटर आहे.
>> नोएडामध्ये पेट्रोल 87.93 रुपये तर डिझेल 80.13 रुपये प्रतिलिटर आहे.
>> चंडीगडमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 79.40 रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment