Petrol Diesel Prices : तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती (Petrol Diesel Price) जाहीर करण्यात आल्या आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत अजूनही 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर असूनही सरकारी तेल कंपन्यांनी गेले काही दिवस दरवाढ केलेली नाही.ज्यामुळे देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किंमती स्थिर आहेत.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपयांवर आहे, तर मुंबईत 120 रुपयांपेक्षा जास्त आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीं मधून VAT कमी करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले आहे. मात्र, त्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगलेच जुंपल्याचे दिसत आहे.

देशातील चारही महानगरांमधील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

Leave a Comment