देशात सलग १३ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान देशात सलग १३ व्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५६ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६३ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७८.३७ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर ७७.०६ रुपयांवर पोहोचली.

शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८५.२१ रुपये झाले. गुरुवारी पेट्रोलचा भाव ८४.६६ रुपये होता. त्यात ५५ पैशांची वाढ झाली. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७५.५३ रुपये झाला आहे. यापूर्वी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलने ८५ ची पातळी ओलांडली आहे. आज पेट्रोलचा एक लीटरचा भाव ८५.२१ रुपयांवर गेला आहे. गेल्या २० महिन्यांतील हा सर्वाधिक दर आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पेट्रोल ८५ रुपयांवर गेले होते.

दिल्लीत पेट्रोलचा दर ७८.३७ रुपये झाला आहे. गुरुवारी तो ७७.८१ रुपये झाला आहे. आज त्यात ५६ पैशांची वाढ झाली. आजचा डिझेलचा भाव ७७.०६ रुपये झाला आहे. त्यात ६३ पैशांची वाढ झाली. कोलकातामध्ये पेट्रोल ८० रुपयांवर पोहोचले आहे. आज कोलकातामधील पेट्रोलचा भाव ८०.१३ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये डिझेल ७२.५३ रुपये झाला. गुरुवारी तो ७१.९६ रुपये होता.चेन्नईत पेट्रोल ८१.८२ रुपयांवर गेले आहे. चेन्नईत डिझेलचा दर ७४.७७ रुपये झाला आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ३८ डाॅलर आहे.

लॉकडाऊनमुळे सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल घटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरुन आता राजकारण अधिक पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात देखील वाढ केली. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment