मुंबई । गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या इंधन दरवाढीचे समर्थन केले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती भारत सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
भारतात 80 टक्के तेल आयात केले जाते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. असे गडकरींनी म्हंटल. आम्ही 2004 पासून भारताला स्वावलंबी बनविण्यावर भर देत आहोत, ज्याद्वारे आपण स्वतःचे इंधन तयार केले पाहिजे, स्वदेशी ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला पाहिजे असेही त्यांनी म्हंटल.
शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली, गेल्या चार दिवसांतील ही तिसरी वाढ आहे. आज शनिवारी देखील पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.20 रुपयांची वाढ झाली आहे
या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे कंपन्यांनी तेलाच्या किमतीत 137 दिवस बदल केला नाही, तर क्रूडचे दर सुमारे 45 टक्क्यांनी महागले आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 113.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.55 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली पेट्रोल 98.61 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 113.35 रुपये आणि डिझेल 97.55 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 104.43 रुपये आणि डिझेल 94.47 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 108.01 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर