यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दरवर्षी गणेशोत्सव म्हंटल की लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना गणेशोत्सव सभारंभाचे वेध लागलेले असतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. अनेक ठिकाणी सजावटी साठी लोक सर्वत्र तयारी साठी लागलेले असतात. सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये या दिवसांमध्ये लगबग सुरू असते. सर्वत्र ठोल ताशा याचा आवाज सुरू असतो पण या वर्षी कोरोनाचे संकट इतके मोठे की आहे की, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. ना कोठे उत्साह आहे ना कुठे लगभग दिसत आहे. सर्वत्र निरव शांतता आहे. त्यामुळे गणपती आलाय अस कोणालाच वाटत नाही.

मार्च मध्ये कोरोनाचे संकट देशावर आले आहे. तेव्हापासून सर्वत्र बंदीचे वातावरण निर्माण आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याहि मंडळाचे गणपती बसणार नाहीत. खूप सध्या प्रकारे यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे जो दरवर्षी धुमधाम असतो तो या वर्षी पाहता येणार आणि कि, अनुभवता सुद्धा येणार नाहीत. कोरोनाच्या पार्शवभूमीवर या वर्षीच्या सर्व गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा त्यासाठी पाठिंबा दिला आहे. अनेक ठिकाणी गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी अनेक आरोग्य संबंधित कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

तसेच या वर्षी घरगुती गणेशोत्सव सुद्धा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. असे अनेक भक्तानी ठरवले आहे. सर्वत्र लॉकडाउन चा कालावधी सुरु आहे, त्यामुळे कुठेही दरवर्षी प्रमाणे जास्त बाजारपेठा सजलेल्या दिसत नाही. अनेक मंडळांनी कोरोनाच्या संदर्भात अनेक अधिसूचना जारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी घरपोहच गणपती सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक भक्तांना गणेशाची मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडावे लागणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment