वृत्तसंस्था । देशातील कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळं देशातील बऱ्याच राज्यात पेट्रोल आणि डिझेल निश्चित मर्यादेत उपलब्ध होत आहे. लॉकडाऊनमुळे तेलाची वाहतूक करणारे टँकर ईशान्य भारतातील मिझोरम राज्यामध्ये पोहोचू न शकल्याने तेथे पेट्रोल-डिझेलचा (Petrol- Diesel) तुटवडा जाणवत आहे. यामुळे, आता स्थानिक लोकांना निर्धारित मर्यादेत इंधन द्यावे, असा मिझोराम राज्य सरकारने (Mizoram Government) निर्णय घेतला आहे.
रेशनप्रमाणे मर्यादेत पेट्रोल आणि डिझेल
मिझोरम सरकारने वाहनांनुसार पेट्रोल आणि डिझेल वितरणाचे प्रमाण निश्चित केले आहे. आता राज्यात स्कूटरसाठी फक्त ३ लीटर, बाईकसाठी ५ लीटर आणि कारसाठी १० लिटरची मर्यादा निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ २० लिटर डिझेल मॅक्सॅबॅब, पिक-अप ट्रक आणि मिनी ट्रकमध्ये भरता येऊ शकणार आहे. सिटी बस आणि इतर ट्रकची मर्यादा १०० लिटर निश्चित करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलही केवळ वाहनांसाठी मिळणार आहे. कॅन, बाटली किंवा इतर कोणत्याही सामग्रीत तेल भरण्यास संपूर्ण बंदी असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”