देशात इंधन दर वाढीचा भडका; सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवल्याने देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून रविवारपासून सुरु असणाऱ्या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलचे ४५ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ केली होती.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईतील पेट्रोलचा दर ८०.४१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ७०.३७ रुपये प्रति लीटर झाले आहे. रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून ७३.४० रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ७१. रु६२पये प्रति लीटर इतका झाला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने करवाढ केल्यानंतरही कंपन्यांनी त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडू न देण्याचा निर्णय घेत किंमती वाढवल्या नव्हत्या. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती दोन दशकांमध्ये सर्वात कमी असतानाच सरकारने ६ मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोलवर प्रति लीटर १० रुपये तर डिझेलवर प्रति लीटर १३ रुपये कर आकारण्यास सुरुवात केल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. मात्र आता हळूहळू कंपन्यांनी या कराचा बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडबरोबर हिंदुस्ताना पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही १४ मार्चपासून इंधनाच्या दरांमध्ये रोज बदल करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. मात्र लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर दररोज इंधनदरवाढ होत असतानाच चित्र मागील ४ दिवसांपासून पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मार्चमध्ये प्रती लीटरमागे ३ रुपयांनी अबकारी कर वाढवल्याने तेल कंपन्यांनी दरवाढ थांबवली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment