पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। लाल समुद्रातून जाणाऱ्या इराणच्या तेल टँकरवर शुक्रवारी रॉकेट हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. रॉकेट हल्ल्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासंबंधी सौदी अरेबियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान ज्या तेलाच्या जहाजावर हल्ला झाला ते जहाज इराणी तेल कंपनी ‘एनओइक’चं आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किंमती ५८ डॉलर प्रतिबॅरल वरून ६० डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. भारतासारख्या कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांवर याचा परिणाम याचा परिणाम दिसून येणार आहे. पुढच्या काही दिवसांत पेट्रोलचे दर २ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत ८० टक्क्यांपेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे भारतातल्या तेल कंपन्या या आयातीवरच अवलंबून असतात.

मागच्या १५ दिवसांतल्या कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे पेट्रोल – डिझेलचे भाव ठरवले जातात. यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमती ६६ ते ६८ प्रतिबॅरल ६६ ते ६८ डॉलर वर जाऊ शकतात. सौदी अरेबिया आणि इराणमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. त्यातच इराणी कंपनीच्या टँकरवरचा हा हल्ला क्षेपणास्त्राने करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरचा अण्वस्त्र करार रद्द केला व त्यांच्यावर निर्बंध लादले तेव्हापासून आखातमध्ये संघर्षाला सुरुवात झाली.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment