देशी इंधनापेक्षा पेट्रोलची किंमत कमी असणार, 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये मिसळले जाणार 20 टक्के इथॅनॉल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल आधारित पेट्रोल वापरण्याच्या भारताच्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय जाहीर केला. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची अंतिम मुदत पाच वर्षांनी कमी करून 2025 अशी केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. यापूर्वी हे लक्ष्य 2030 पर्यंत पूर्ण करायचे होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आता इथॅनॉल 21 व्या शतकाच्या भारतातील प्रमुख प्राधान्यांपैकी एक बनला आहे. इथेनॉलवर लक्ष केंद्रित केल्याने पर्यावरणावर तसेच शेतकर्‍यांच्या जीवनावर चांगला परिणाम होत आहे. ” ऊस आणि गहू, तुटलेले तांदूळ आणि शेष अवशेष यासारख्या खराब झालेल्या धान्यांमधून इथेनॉल काढला जातो. यामुळे प्रदूषण कमी होते आणि शेतकर्‍यांना स्वतंत्र उत्पन्न मिळविण्याचे साधन देखील मिळते. यामुळे वाहनांचे प्रदूषण उत्सर्जन कमी करण्याबरोबरच इंधन आयात बिलात होणार्‍या खर्चाची बचत करण्यात भारताला मदत होईल.

सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे

ते म्हणाले की, सध्या पेट्रोलमध्ये सुमारे 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे, तर 2014 मध्ये या मिश्रणाची पातळी केवळ 1-1.5 टक्के होती. ते म्हणाले की,” इथेनॉल अधिक मिसळल्यामुळे इथेनॉलची खरेदी दरवर्षी 38 कोटी लिटरवरून 320 कोटी लिटरवर गेली आहे.” ते पुढे म्हणाले की, “जेव्हा 20 टक्क्यांचे मिश्रण करणे सुरू होईल, तेव्हा इथेनॉल खरेदीचे प्रमाण आणखी वाढेल,”

2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य

गेल्या वर्षी तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदीवर 21,000 कोटी रुपये खर्च केले. या आठवड्याच्या सुरूवातीला तेल मंत्रालयाने 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याची गॅझेट अधिसूचना जारी केली होती. सन 2025 पर्यंत देशात विक्री झालेल्या सर्व पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

इथेनॉल हे शेतकर्‍यांचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे, जो आपल्या मागणीच्या 85 टक्क्यांहून अधिक मागणीची पूर्तता करण्यासाठी विदेशातून आयात करण्यावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की,” इथेनॉलवर लक्ष केंद्रित केल्याने पर्यावरणावर तसेच शेतकर्‍यांच्या जीवनावर चांगला परिणाम होतो. आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी एक साधन उपलब्ध होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment