हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल प्रत्येक घरामध्ये एक तरी गाडी असतेच. या गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असतो. परंतु बहुतेक गाड्या पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. आपण जेवढे पेट्रोल आणि डिझेल आपल्या गाडीमध्ये भरू त्याप्रमाणे आपल्याला रक्कम द्यावी लागते. भारतामध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे पेट्रोल पंप देखील चालू झालेले आहे परंतु या पेट्रोल पंपावर लोक केवळ पेट्रोलच भरत असतात. परंतु पेट्रोल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल पंपावर अनेक सुविधा देखील मिळत असतात. या सुविधा मोफत असतात. यासाठी तुमच्याकडून काहीच पैसे आकारले जात नाही. परंतु अनेक लोकांना या गोष्टीची माहिती नसल्याने त्यांना या सुविधांचा उपभोग घेता येत नाही.
जर तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा कमी असेल, तर अनेक वेळा तुम्ही मेकॅनिकच्या दुकानात जाता. आणि हवा भरता. परंतु तुम्ही जर पेट्रोल पंपावर ही हवा भरली, तर तुमच्याकडून कोणत्याही शुल्क आकारले जाणार नाही. पेट्रोल पंपाकडून मोफत सुविधा दिली जाते, जर त्या पंप कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडे पैशाची मागणी केली, तर तुम्ही त्यासाठी तक्रार करू शकता.
पिण्याच्या पाण्याची शौचालयाची सोय
पेट्रोल पंपावर तुम्हाला मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील असते. तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन पाणी पिऊ शकता. तसेच बॉटल भरून नेऊन देखील शकता. तसेच सार्वजनिक सुविधांचा वापर करू शकता. या ठिकाणी बनवलेले शौचालय हे सार्वजनिक वापरासाठीच असते. त्यामुळे तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन कधीही शौचालय वापरू शकता.
करू शकतो आपत्कालीन कॉल
तुम्ही प्रवास करत असताना जर तुमचा मोबाईल हरवला किंवा बॅटरी कमी असेल, तर तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन लँडलाईनवरून मोफत कॉल करू शकता. आणि असे करण्यासाठी पेट्रोल पंपांचा मालकही तुम्हाला रोखू शकत नाही. कारण पेट्रोल पंपाच्या नियमांमध्ये हा एक महत्त्वाचा नियम आहेम या काही साधारण आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा सुविधा तुम्हाला पेट्रोल पंपाकडून मिळतात. परंतु अनेक लोकांना त्या गोष्टीची माहिती नसल्याने या सुविधांचा लाभ घेता येत नाही.