फलटणला दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लोणंद पोलीसांचे रात्रगस्तीचे पथक हे गस्त घालीत असताना पाडेगांव येथील नेवसेवस्ती (ता. फलटण) गांवाचे हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच इसमांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सखोल तपास करुन लोणंद, तसेच फलटण व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहीरीवरील चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटारी, एक HTP पंप व पाण्याचे वॉल असा एकुण 1 लाख 54 हजार रुपये मुदेमाल हस्तगत केला आहे. नऊ गुन्हे लोणंद पोलिसांना उघडकीस आणण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर प्रकरणात महंमद अल्ली रमजान अल्ली (वय- 32 रा. परसा स्टेशन ता. सोरतगढ जि सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश सध्या रा. बाळुपाटलाचीवाडी ता. खंडाळा), महमंद इम्रान अब्दुल मोहीद (वय- 37, रा. रोमनदेही. सोरतगढ जि. सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश सध्या रा. बाळुपाटलाची वाडी ता. खंडाळा), संत भगवानदास कनोजिया (वय- 35 वर्षे, रा. डुबरी ता.तुलसीपुर जि. बलरामपुर उत्तरप्रदेश, फकरुऊद्दीन बहादुर खान (वय- 20 रा. पिपरा जि.बलरामपुर उत्तरप्रदेश), आलम सऊद खान (वय- 42, रा. रोमनदेही ता सोरतगढ जि.सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश सध्या रा.बाळुपाटलाची वाडी ता. खंडाळा) अशा पाच जणांना अटक करण्यात आले असून त्यांनी 9 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पोलिस उपनिरिक्षक गणेश माने, सहा फौजदार महेश सपकाळ, यांनी कारवाई केली.

Leave a Comment