Phaltan Doctor Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्येबाबत मुख्यमंत्र्यांची सभागृहात महत्वाची माहिती

Phaltan Doctor Case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Phaltan Doctor Case । साताऱ्यातील फलटण येतील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्वाची माहिती सांगितली आहे. पोलीस अधिकारी बदनेने महिला डॉक्टरचं शोषण केल्याच तपासातून स्पष्ट झालय. त्या शिवाय या प्रकरणात अजून काही गंभीर आरोप झाले आहेत असं फडणवीस म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे महिला डॉक्टरने हातावर जी चिट्ठी लिहिली होती ते हस्ताक्षर तिचे स्वतःचेच होते अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले फडणवीस ? Phaltan Doctor Case

भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येबाबत विचारणा केली. ‘गुन्हेगारी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरफार करण्याचा दबाव त्या डॉक्टरवर अटकेतील आरोपींपैकी एकाने टाकला असल्यामुळे, तिने आत्महत्या केली का? या प्रकरणातील असा सवाल साटम यांनी केला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत काय काय तपास झाला याची माहिती दिली. आतापर्यंतच्या तपासात फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे, ती हस्ताक्षर तिचेच आहे” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली. Phaltan Doctor Case

दुसरा मुद्दा म्हणजे आरोपींनी दबाव आणला का? तर या सगळ्या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने आहे. या बदनेची जी माहिती आपल्याकडे आलेली आहे. जे चॅट्स आलेले आहेत. त्यात तिची फसवणूक करून बदनेने तिचे शारीरिक शोषण केले असल्याचे लक्षात येत आहे. त्यातून लग्नाचे आमिष दाखवणे वगैरे गोष्टी लक्षात येतात. नंतर बदनेने वेगळी भूमिका घेतलेली दिसते. त्याने तिचे शोषण केल्याचे लक्षात येते”, असे फडणवीस म्हणाले. ती मेडीकल ऑफिसर होती, ज्या आरोपाीला अटक होते तो अटकेकरता फिट आहे का? याबाबत रिपोर्ट घ्यावा लागतो” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. सदर महिला डॉक्टरने काही रिपोर्ट अनफिट दिल्याने पोलिसांनी एक मोठं पत्र वरिष्ठांना लिहिलं. हे मोठे गुन्हेगार असून, त्यांना अनफिटचं प्रमाणपत्र दिलं जात आहे अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर चौकशी झाली आणि तिने ही पत्र लिहिलं. पण हे सगळं 5 महिन्यापूर्वीचं हे असं फडणवीस म्हणाले.