माणुसकीचे दर्शन ः पोलिसांमुळे चार वर्षाच्या मुलांच्या सर्जरीचा मार्ग मोकळा

सातारा पोलिस दलातील 2014 बॅचमधील पोलिसांच्या व्हाट्सअप ग्रुपची मदत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील म्होप्रे येथील गंभीर भाजलेल्या चार वर्षाच्या मुलांची सर्जरी करण्यासाठीचा सोशल मीडियावरील मेेसेज सातारा पोलीस दलातील 2014 च्या बॅच पोलिसांच्या असलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर येऊन पोहचला. अन् क्षणांचाही विलंब न लावता पोलिस थेट मदतीसाठी हाॅस्पीटलला पोहचले. त्यामुळे आता पैशाविना खोळंबलेली सर्जरीचा मार्ग पोलिसांच्या माणुसकीने मोकळा होणार आहे.

म्होप्रे येथे गतमहिन्यात श्लोक आप्पा बुधावले (वय- 4 वर्षे) हा मुलगा घरात पेटलेल्या चुलीवर पडून गंभीर भाजला गेला होता. सध्या चैतन्य हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू असून वैद्यकीय खर्च दोन लाखांच्या घरात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. जखम खूप गंभीर असल्याने उपचार करणे गरजेचे होते.पण हॉस्पिटलचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. श्लोकच्या घरची परिस्थिती गरिबीची हातावर पोट असणारी असल्याने घरच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली होती.

सदरील बातमी सोशल मीडियाव्दारे फिरत होती. सातारा पोलीस दलातील 2014 च्या बॅच पोलिसांच्या असलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर श्लोकच्या घटनेची माहीती पोहचली. तेव्हा या ग्रुपमधील सर्वांनी मिळून मदत करायचे ठरविले. चार वर्षाच्या मुलाला उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून केवळ एका दिवसात 76 हजार 500 रुपये रोख रक्कम म्हणून दिली. मुलांची डॉक्टरांकडे विचारपूस केली असता, त्याची सर्जरी उद्या होणार आहे असे समजले. पोलिसांच्या या मदतीमुळे बुधावले परिवारातील सर्वांच्या चेहऱ्यावर मदत समाधान दिसत होते.

You might also like