PhonePe ने सुरु केली आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PhonePe  : UPI मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे डेबिट कार्ड असणे महत्वाचे आहे. डेबिट कार्डद्वारे OTP ऑथेंटिकेशन केल्यानंतरच आपल्याला UPI वापरता येते. मात्र आता आपल्याकडे डेबिट कार्ड (ATM) नसेल तरीही आपल्याला UPI वापरता येईल. हे जाणून घ्या कि, ऑनलाइन पेमेंट App असलेल्या PhonePe कडून आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशनची सुविधा देऊन ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

आता PhonePe App वरील नवीन युझर्सना आधार कार्ड आणि OTP ऑथेंटिकेशन द्वारे UPI ऍक्टिव्हेट करता येईल. तसेच आता ज्या युझर्सकडे डेबिट कार्ड (ATM) नाही त्यांना देखील UPI द्वारे पैसे भरता येईल. आज आपण डेबिट कार्डशिवाय UPI साठी रजिस्ट्रेशन कसे करावे ते जाणून घेउयात…

PhonePe पर आया कमाल का फीचर ! अब बिना डेबिट कार्ड के कर सकेंगे UPI Payment,  जानिए तरीका - Livesiwan.com

UPI बाबत जाणून घ्या

UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. ही एक रिअल-टाइम पेमेंट सिटीम आहे ज्याद्वारे मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे दोन बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. हे ध्यानात घ्या कि, UPI द्वारे आपल्याला एकाच मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अनेक बँक खात्यांमध्ये एक्सेस करता येतो. हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने तयार केले आहे, ज्याची देखरेख रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाते.

PhonePe UPI Activation With Aadhaar: Here's How

आधारद्वारे अशा प्रकारे ऍक्टिव्हेट करा UPI

PhonePe App वर आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन करण्यासाठी UPI ​​युझर्सना आपल्या आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक एंटर करावे लागतील. यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि बँकेकडून एक OTP मिळेल. त्यानंतर आपला UPI ऍक्टिव्हेट होईल. ज्यानंतर PhonePe App वापरणाऱ्या कोणात्याही युझर UPI वरून पैसे ट्रान्सफर करता येईल.

PhonePe hits 250 mn user mark, registers 925 mn transactions in October -  The Economic Times

नवीन युझर्सना अशा प्रकारे करता येईल UPI रजिस्ट्रेशन

सर्वात आधी आपल्या मोबाईलवर Phone Pe App इन्स्टॉल करा.
यानंतर आपला फोन नंबर आणि OTP टाकावा लागेल.
यानंतर My Money वर जाऊन Payment Methods वर क्लिक करा.
त्यानंतर ‘नवीन बँक खाते जोडा’ वर क्लिक करा आणि ज्या बँकेत आपले खाते असेल ते निवडा.
येथे मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल.
आता आपला UPI पिन कॉन्फिगर करण्यासाठी दोन पर्याय मिळतील.
येथे डेबिट/एटीएम कार्ड किंवा आधार कार्डपैकी एकाची निवड करता येईल.
येथे आधार नंबरचे शेवटचे सहा अंक टाकल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल.
यानंतर OTP टाकताच आपला UPI पिन ऍक्टिव्हेट होईल. आता त्याच्या सर्व फीचर्सचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : 

हे पण वाचा :
Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 573% रिटर्न
‘या’ Penny Stock ने एका महिन्यात तिप्पट नफा देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 10 हजारांच्या SIP द्वारे मिळाला 12 कोटींचा रिटर्न
Flight Ticket Offer : फक्त ₹ 6,599 मध्ये परदेशात तर ₹ 1199 मध्ये देशभर प्रवास करण्याची संधी !!! ‘या’ कंपनीने सुरु केली धमाकेदार ऑफर