Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget Cars : कोरोना काळानंतर भारतीय ऑटो सेक्टर जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. सध्या भारतीय ऑटोमोबाईल बाजारात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होते आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांकडूनही कमी बजट असलेली अनेक वाहने बाजारात लाँच केली जात आहेत. त्याचबरोबर जबरदस्त फीचर्स आणि तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या गाड्या उपलब्ध करून देण्यावर कंपन्या भर देत आहे. अशा परिस्थितीत, जर आपल्याला एखादी कार खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. चला तर मग आज आपण 10 लाख रुपये बजट असलेल्या कार विषयीची माहिती जाणून घेउयात…

आता आपल्याला दहा लाख रुपयांच्या बजटमध्ये इलेक्ट्रिक कार देखील घेता येईल. सध्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago ही आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच यामध्ये 250 किमी. ची कॅटेगिरी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे टियागोच्या टॉप मॉडेलमध्ये ही रेंज 350 किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. Budget Cars

Toyota Glanza Price - Images, Colours & Reviews - CarWale

बजट कारच्या या लिस्टमध्ये टोयोटाच्या हॅचबॅकचा देखील समावेश होतो. यामधील Toyota Glanza ची एक्स-शोरूम किंमत 6.59 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये आहे. यामध्ये पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंट उपलब्ध आहे. यासोबत टोयोटाने 1197 CC चे इंजिन दिले आहे. तसेच ही कार 18 किमी प्रति लीटर मायलेज देईल असा दावा कंपनी कडून करण्यात आला आहे. Budget Cars

AURA Highlights - Stylish New Sedan | Hyundai India

जर आपण मिड साइज सेडान कॅटेगिरीमधील कार खरेदी करणार असाल तर ह्युंदाईची शाडाना Aura एक चांगला पर्याय ठरू शकेल. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.20 लाख रुपयांपासून सुरू होऊन 8.97 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये पेट्रोल आणि CNG असे दोन्ही व्हेरिएंटचे पर्याय उपलब्ध आहेत. Budget Cars

Mahindra Thar Price - Images, Colours & Reviews-91Wheels

महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या एसयूव्हींपैकी थार देखील एक आहे. या कारची किंमत 10 लाख रुपये आहे. महिंद्राने आता थारचे 4×2 व्हर्जन लॉन्च केले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. यामध्ये 1497 CC डिझेल इंजिन देण्यात आले आहे. आता कंपनीकडून लवकरच त्याचे 5 डोअर व्हर्जन देखील लॉन्च केले जाणार आहे. Budget Cars

Tata Nexon Price in India 2023 - Images, Mileage & Reviews - carandbike

देशातील सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV, Nexon ही आहे. ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.70 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच ही कार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या तिन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 1199 CC चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार 17.57 किमी. प्रति लीटर मायलेज देईल असा दावा कंपनी कडून करण्यात आला आहे. नेक्सॉनला NCAP रेटिंगमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. Budget Cars

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.cardekho.com/tata/nexon-ev-prime

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये