पुणे प्रतिनिधी। महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रचार सुरू झाला असून अनेक पक्षांनी दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवलेत. यावेळी अनेक निष्ठावंतांना डावलल्याने बऱ्याच जणांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबला तर काहींनी माघार घेतली. दिगगजांना तिकीट डावलून नवीन चेहरे देण्याचा अनेक पक्षांनी प्रयत्न केलेला दिसतो. अनेकांनी धनदांडग्यांना उमेदवारी दिल्याने लोकशाहीचा उत्सव हा केवळ श्रीमंतांची मक्तेदारी आहे का असा प्रश्न नेहमी पडतो. यंदाही काही मतदारसंघात तोच प्रत्यय आला आहे.
पुण्यात मात्र बहुजन मुक्ती पक्षाने वेगळा मार्ग अवलंबत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोनमेंट विधानसभा मतदारसंघातून फोटोग्राफी करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली आहे. किशोर बाजीराव तुपारे असं या उमेदवाराचं नाव आहे. तुपारे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील असून पुण्याच्या महर्षीनगर परिसरातील मीनाताई ठाकरे झोपडपट्टीत राहतात. तुपारे यांचा जन्म १९७७ सालचा. १९९० साली पुण्यात आलेल्या तुपारे यांनी कुटुंबियांच्या पाठिंब्यावर गुलटेकडी, डायस प्लॉट, महर्षीनगर आदी भागात फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचा ठामपणे सामना करत त्यांनी अल्पावधीतच व्यवसाय भक्कम केला. सासरे आणि पत्नी यांच्या पाठिंब्यावर त्यांनी व्यवसायात अपेक्षित यश मिळवलं. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वकील होण्याचं स्वप्न पाहिलं होतं मात्र बेताच्या परिस्थितीने त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. एवढं असतानाही समाजकारणाची कास त्यांनी सोडली नाही.
तुपारे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. यंदा त्यांची पुणे शहर अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यास प्रयत्न केला आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेसाठी ते पुण्याचे संयोजक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मतदारसंघातील परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलण्याची ताकद युवा वर्गामध्ये असून त्यांनी साथ दिल्यास मी विधानसभा निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढे भाजपच्या सुनील कांबळे आणि काँग्रेसच्या रमेश बागवे यांचे आवाहन असणार आहे. एक सामान्य उमेदवार मुरलेल्या राजकारण्यांना कशी लढत देतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
इतर काही बातम्या –
म्हणुन आम्ही मुक्ताईनगरातून माघार घेतली, रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी पवारांचा मास्टर प्लान
वाचा सविस्तर – https://t.co/PNUuTRxJfg@BJP4Maharashtra @MumbaiNCP @EknathKhadseBJP #MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे
वाचा सविस्तर – https://t.co/Bw1Xg9RsiD@NCPspeaks @BJP4Maharashtra @BJPLive @ChDadaPatil #kothrud #MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
‘जेएनयू’च्या उमर खालिदवर गोळीबार करणाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी
वाचा सविस्तर – https://t.co/WDeuYr9rNx@UmarKhalidJNU @ShivsenaComms @ShivSena #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019