व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पिकअप टेम्पोची उसाच्या ट्रकला पाठीमागून धडक; 6 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | लग्नावरून परत येणाऱ्या मंगरूळ येथिल कुटुंबावर काळाने घाला घातला असून पिकप टेम्पोने उभा उसाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री सिल्लोड शहराजवळील मोढा फाटा येथे घडली.

सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा इथून लग्न लावून परत येत असताना हा भीषण अपघात झाला असून यात नवरदेवाच्या दोन्ही काकूंचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अशोक संपत खेळवणे, संगीता रतन खेळवणे, लक्ष्मीबाई अशोक खेळवणे, संजय संपत खेळवणे , जिजाबाई गणपत खेळवणे, रंजनाबाई संजय खेळवणे या सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर या अपघातात 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी नऊ जणांना घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून अपघातात मृत्यू झालेल्यांवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात सहाजणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाले आहे.

या अपघातात पिकप क्रमांक एम एच 29 81 या गाडीने मुद्दा फाटा येथे नादुरुस्त उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ला पाठीमागून जोराची धडक दिली होती. या अपघातात पिकप गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे,
अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी दिली