हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Picnic Spots For Kids) येत्या आठ्वड्याभरात मुलांच्या शाळांची उन्हाळी सुट्टी संपून जाईल. मग मुलांचं रोजचं रुटीन सुरु होईल. शाळा, क्लास आणि अभ्यास. या सगळ्यासाठी मुलांनी फ्रेश असायला हवं. म्हणजे मुलांचं शाळेत मन लागेल आणि अभ्यासातही ते एकाग्र होऊ शकतील. शिवाय, शाळा सुरु झाली की, सगळी वर्गावर्गात मुलांमध्ये कुठे फिरायला गेला होतास? सुट्टीत काय काय केलस? अशी चर्चा असते.
त्यामुळे मुलांना पूर्ण उन्हाळी सुट्टी कुठे ना कुठे फिरायचं असत. यासाठी कित्येकदा मुलं हट्ट करतात. पण आपल्या व्यस्त शेड्युलमुळे मुलांना रोज फिरायला नेणं काही शक्य होत नाही. (Picnic Spots For Kids) मग, कुठे लांब फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा जवळच्या जवळ फिरता येईल असे स्पॉट्स विझिट करा. अशाच काही मस्त ठिकाणांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला जाणून घेऊया.
1. राणीबाग
मुंबईतील भायखळा विभागात असणारी राणीची बाग ही प्रत्येक लहान मुलाची पहिली पसंत असते. (Picnic Spots For Kids) लहान मुलांचे हे अत्यंत आवडते पर्यटन स्थळ आहे. इथे असलेले प्राणी पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळतो.
2. नॅशनल पार्क (Picnic Spots For Kids)
बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क हे मुलांना फिरायला न्यायला एक मस्त ठिकाण आहे. या ठिकाणी आवर्जून मुलांना वनराणी जंगल सफारी घडवा. ही एक टॉयट्रेन आहे. ज्यामधून जंगल सफारी करताना मुलं एकदम खुश होऊन जातात. याशिवाय नॅशनल पार्कमध्येच असणारी कान्हेरी गुंफा हे मुलांना इतिहासाची ओळख करुन देण्यासाठी एक चांगले ठिकाण मानले जाते. त्यामुळे नॅशनल पार्क फिरताना मुलांना आवर्जून या ठिकाणी न्या. तसेच येथे तुम्ही मुलांना लायन सफारीसुद्धा घडवू शकता. एका बसमधूल ही सफारी घडवली जाते. ज्या दरम्यान वाघ आणि सिंह असे प्राणी पहायला मिळतात.
3. बॉटनिकल गार्डन
मुलांना एखाद छान गार्डन दाखवायचं असेल तर त्यांना सायनमधील बॉटनिकल गार्डनमध्ये घेऊन जा. (Picnic Spots For Kids) या गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे पाहताना मूल कधी रमतील समजणार सुद्धा नाही.
4. नेहरु सायन्स सेंटर
मुंबईत वरळी येथे असणाऱ्या नेहरु सायन्स सेंटरमध्ये मुलांना विज्ञासाशी संबंधित अनेक प्रयोग पहायला मिळतात. जे मुलांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल वाढवते. त्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे.
5. नेहरु तारांगण
जर तुमच्या मुलांना अंतराळ तसेच ग्रह, ताऱ्यांच्या निरीक्षणाची आवड असेल तर मुंबईतील वरळी भागात असणाऱ्या नेहरु तारांगण येथे मुलांना जरूर घेऊन जा. इथे मुलांना आकाशाचे आभासी भ्रमण करता येते. (Picnic Spots For Kids) हा अनुभव अत्यंत वेगळा आणि आनंददायी असतो.
6. तारापोरवाला मत्स्यालय
मुंबईतील मरीन लाईन्स येथे असेलेले तारापोरवाला मत्स्यालय हा देखल एक चांगला पर्याय आहे. इथे मुलांना विविध प्रकारचे मासे तसेच सागरी जीव पहायला मिळतील. (Picnic Spots For Kids)