Pik Vima Yojana | पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्याय देखील आणण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे.
आपल्या राज्यामध्ये पिक विमा योजनेबाबत ज्या काही अडीअडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विचार करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी ही बैठक आयोजित केलेली होती.
या बैठकीमध्ये सुरुवातीला जो चालू हंगाम आहे. त्याबद्दलच्या पीक विमा चा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे त्यानंतर आधार लिंक आणि इतर कारणांमुळे पिक विमा पासून जे काही शेतकरी वंचित आहे. त्या शेतकऱ्यांच्या यदा ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्याची सूचना धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. 2016 नंतर सर्वात जास्त पिक विमाचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळत असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी या बैठकीत सांगितले.
लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून तक्रारी येत असल्याने पीक विम्याच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहे. त्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अन्य पर्यायाचा विचार केला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल असे आदेश त्यांनी दिले आहेत.
त्यामुळे आता यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या पिक विमा मिळण्याबाबत ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या देखील अडचणी दूर करण्याचा आदेश धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता त्या सगळ्या अडचणी दूर होऊन शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. असे त्यांनी आश्वासन देखील दिलेली आहे.