पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत ऑफिसमधून तरुणीचे अपहरण; थरार CCTVमध्ये कैद

पुणे । पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. याप्रकरणी अवघ्या ६ तासांच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केलीय.

शंतनू चिंचवडे वय असे आरोपी तरुणाचे नाव असून, तरुणी आणि आरोपी शंतनू चिंचवडे यांच्या दोघांमधील प्रेम संबंधातून ही घटना घडलीय. आरोपी शंतनू चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारींचे प्रकरण वाढत चालले आहेत. आता पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचं अपहरण केल्यानं पिंपरी-चिंचवडमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे आरोपी अपहरण करत असतानाची सर्वच घटना सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाली आहे. आरोपी कशा प्रकारे तरुणीचं अपहरण करत होते, तसेच तरुणीनं कशा प्रकारे आरोपींना प्रतिकार केलाय, हे सर्वच समोर आलंय. (Pimpri-Chinchwad a Young Woman Was Abducted From Her Office At Gunpoint)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’