Pipeline Subsidy Scheme | शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी मिळणार 15 हजार रुपयांचे अनुदान; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pipeline Subsidy Scheme | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असतो. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक मदत होण्यासाठी सरकारकडून (Government) अनेक योजना राबवल्या जातात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अधिक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना अनेक सोयी सुविधा देखील पुरवल्या जातात.

सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाईपलाईन (Pipeline Subsidy Scheme) करण्यासाठी देखील पीव्हीसी पाईप तसेच एचडीपीएसाठी अनुदान दिले जाते. आता नक्की ही योजना काय आहे,. आणि त्याच्या अनुदानाबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पाईपलाईनसाठी किती अनुदान मिळते ? | Pipeline Subsidy Scheme

शेतकऱ्यांना जर पाईपलाईनसाठी अनुदान घ्यायचे असेल, तर या योजनेच्या माध्यमातून पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर या दराने शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. हे अनुदान 500 मीटर पर्यंत मिळत असते. या योजनेतून जास्तीत जास्त 15 हजार रुपयांच्या अनुदान शेतकऱ्यांना मिळते.

अनुदानासाठी नियम आणि अटी

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे देखील गरजेचे आहे.
  • शेतकरी दारिद्र्यरेषेखाली असेल तरच त्याला या पाईपलाईन योजनेचा लाभ दिला जातो..
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून पाईप खरेदी करण्यासाठी 50% अनुदान मिळते आणि उरलेली रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे करावा ? | Pipeline Subsidy Scheme

या पाईपलाईन अनुदान योजनेसाठी तुम्हाला शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करताना शेतकऱ्याचे नाव जर आले, तर त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.