Sunday, May 28, 2023

बनावट ब्रँडेड Scotch आणि Whisky ची विक्री थांबविण्यासाठी पियुष गोयल यांनी बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लवकरच स्कॉच व्हिस्की ब्रिटनहून भारतात येऊ शकेल. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारी म्हणाले की,’ द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराचे नियोजन सुरू आहे.’ ते म्हणाले की,’ ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यासाठी भारत वाटाघाटी करण्यास तयार आहे.’ वाणिज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,’ त्यांनी ब्रिटनला याबाबत प्रस्ताव दिला आहे की, दोन्ही देशांनी मुक्त व्यापार करारावर (ATF) बोलणी सुरू करावीत ही काळाची गरज आहे.’ ते म्हणाले की,’ भारत ब्रिटनशी मुक्त व्यापार करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे कॉमन वेल्थ देशांसाठीही चांगले असेल.’

बनावट दारू बंदी घालण्याची योजना आखली गेली आहे
पीयूष गोयल यांनी असेही म्हटले आहे की,’ मला आशा आहे की,’ ब्रिटीश टीमही याबद्दल उत्साहित होईल. मी भारतात मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यावर चर्चा करण्यास तयार आहे.’ इंडस्ट्री असोसिएशन CII च्या इंडिया-युके पार्टनरशिप समिट वेळी ते म्हणाले की,’ मी स्कॉच व्हिस्की पितो असे नाही परंतु भारतात असे आढळले आहे की, भारतात स्कॉचच्या नावावर अनेक बनावट अल्कोहोल विकले जात आहेत. माझा विश्वास आहे की, ब्रिटनमधून स्कॉच व्हिस्कीची आयात केल्याने देशात बनावट दारू बंदी होईल आणि लोकांना खरी स्कॉच मिळू शकेल.’

यूके कंपन्यांना भारतात काम करण्याची विस्तृत संधी आहे
पीयूष गोयल म्हणाले की,’ भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापारामुळे दोन्ही देशांना अनेक संधी मिळतील. आमच्याकडे MSME, शेती, डेअरी, मत्स्यव्यवसाय, हस्तकला, ​​वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी आहेत. आमच्याकडे अनेक क्षेत्रे आणि उद्योग असे आहेत ज्यात यूके कंपन्यांना काम करण्याची मोठ्या संधी उपलब्ध आहेत.’ ते पुढे म्हणाले की,’ ज्या देशांमध्ये ब्रिटन निव्वळ आयातकर्ता आहे आणि ज्या देशांना तुलनात्मक फायदा आहे अशा क्षेत्रात दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढवू शकतात.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.