हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Plane Crashed : आंतराष्ट्र्रीय पटलावरून क्रीडा विश्वाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील स्टेट्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ भीषण विमानाचा अपघात झाला. अपघातात निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल, त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं रेसिंग जगाला मोठा हादरा बसला असून अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ग्रेग बिफल यांचे खासगी जेट विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळलं. या अपघातावेळी आगीचा अक्षरशः भडका उडाला.
विमान कसे कोसळले – Plane Crashed
मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 6 मिनिटांनी Cessna C550 हे विमान फ्लोरिडाच्या दिशेने उड्डाणासाठी सज्ज झाले होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच तांत्रिक अडचण जाणवल्याने विमानाने पुन्हा विमानतळावर परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच हे विमान थेट जमिनीवर कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत ५५ वर्षीय ग्रेग बिफल, त्यांची पत्नी क्रिस्टीना, त्यांचा ५ वर्षांचा मुलगा रायडर आणि १४ वर्षांची मुलगी एम्मा यांचा दुर्दवी मृत्यू झाला. विमानात डेनिस डटन, त्यांचा मुलगा जॅक आणि बिफलचा जवळचा मित्र क्रेग वॅड्सवर्थ हे देखील होते. कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की मृत्यू पावलेले सर्वजण आमच्यासाठी आमचं सर्व काही होते, जणू ते आमचे जगच होते, आता त्यांच्याशिवाय जीवन जगणे कठीण आहे. आता ते सर्वजण या जगता नाहीत, त्यामुळे आमच्या आयुष्यात कधीही भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. Plane Crashed
🚨SHOCKING & HEARTBREAKING
— Turbine Traveller (@Turbinetraveler) December 19, 2025
Newly released footage shows the moment a Cessna Citation II crashed in Statesville, North Carolina.
Seven people were killed, including former NASCAR driver Greg Biffle, his wife, and their children.
Terrifying video. An unspeakable tragedy. 💔 pic.twitter.com/HqR8BceAq9
बिफलचे कुटुंब केवळ त्यांच्या समृद्धीसाठीच नव्हे तर त्यांच्या परोपकारी कार्यासाठी देखील ओळखले जात होते. ग्रेग बिफल यांच्या निधनाने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर चाहते, सहकारी खेळाडू आणि अमेरिकेतील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 55 वर्षीय ग्रेग बिफल हे नॅसकार मधील नामवंत ड्रायव्हर होते आता ते निवृत्त झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक नॅसकार शर्यतीमध्ये विजय मिळवला होता. यामध्ये 19 कप सिरीज विजयांचा समावेश आहे. 2000 मध्ये ट्रक सिरीज चॅम्पियनशिप, तर 2002 मध्ये एक्सफिनिटी सिरीजचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते. त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना, NASCAR ने त्याचे वर्णन एक स्पर्धक म्हणून केले ज्याने खेळावर अमिट छाप सोडली. त्याचे सहकारी आणि चाहते त्याला केवळ एक उत्तम ड्रायव्हर म्हणूनच नव्हे तर एक निष्ठावंत आणि समर्पित मित्र म्हणून देखील लक्षात ठेवतील.




