Plane ticket : स्वस्तात करायचाय विमान प्रवास ? मग ‘या’ दिवशी करा बुकिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Plane ticket : आयुष्यात येऊन एकदा तरी विमानाचा प्रवास करावा अशी अनेकांची स्वप्ने असतात. पण इतर प्रवासाच्या तुलनेत विमान प्रवासाचा खर्च नक्कीच जास्त असतो यात शंका नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही विमान कम्पन्या अशाही आहेत ज्या स्वस्तात विमान प्रवास घडवतात. त्यामुळे विमानाचे तिकीट बुक (Plane ticket) करताना थोडं डोकं लावून काम केल्यास अतिरिक्त खर्च येणार नाही याचसंबंधीच्या ट्रिक्स आज आपण या लेखात जाणून घेऊया…

या दिवशी करा बुकिंग

मंगळवार आणि बुधवार या आठवड्यातील दोन दिवशी विमान तिकिटे स्वस्त (Plane ticket)असतात. या दिवशी जवळपास 8 ते 15 टक्के कमी दराने विमान तिकीट मिळू शकतं.

किती वाजताचे बुकिंग फायदेशीर ?

विमान तिकिटांचं बुकिंग हे कधीही सकाळी 6 वाजताच्या सुमारास (Plane ticket) करायचं, इतर वेळांच्या तुलनेत तेव्हा विमान तिकिटांचे दर परवडणारे असतात. तर, याउलट संध्याकाळी आणि रात्री विमानांचे तिकीट दर सर्वाधिक असतात.

या तारखेचे बुकिंग फायदेशीर

कुठेही जायचं असेल तरी शक्यतो महिनाभर आधी विमानाचं तिकीट (Plane ticket) बुक करा. महिन्याच्या 28 तारखेला बुकिंग केलं तर उत्तम. त्यामुळे तुमची बचत होऊ शकते.

विकेंडला बुकिंग करणे टाळा (Plane ticket)

कधीच शनिवारी किंवा रविवारी विमानाचं तिकीट बुक करू नका. शिवाय बुकिंग (Plane ticket) करताना फ्लेक्सिबल डेट निवडा. त्यामुळे तुम्हाला नंतर गरज असेल तर अधिकचे पैसे न देता प्रवासाची तारीख बदलता येते.