कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
स्वच्छ सुंदर व वसुंधरा योजनेत शासनाने अनेक पारितोषिक देवून गाैरविलेल्या कराड शहरात आज वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील प्रत्येक घटकाने पर्यावरण जपण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. कराड येथील ईदगाह मैदानावरील शिकलगार झोन याठिकाणी मुस्लिम समाजाकडून वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे मुस्लिम समाजाने सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक अशोक पाटील, मुकुंद चरेगावकर, प्रमोद पाटील, झाकीर पठाण, आयुब शिकलगार, युनूस शिकलगार, आकीब शिकलगार, फैय्याज शिकलगार, कादर शिकलगार, मुनीर शिकलगार, सिकंदर शिकलगार यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ईदगाह मैदानावर सध्या मुस्लिम समाजाने वृक्षारोपण केले आहे. तसेच या झाडांची काळजी घेण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये पाणी योजना, झाडांना जाळी मारणे, तसेच देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.