प्लाझ्मा स्प्रे! 30 सेकंदांत कोरोना विषाणू खल्लास; संशोधनातून खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जगभरात कोरोनाची दुसरी, तिसरी लाट सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरू लागला असून रुग्णांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन लोकांना करत आहेत. हिवाळ्याचे दिवस असून थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळं कोरोनापासून बचाव करण्यासाठी दक्षता घेणं अजूनही गरजेचं आहे.

त्यानुसार मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे. एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोना व्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो.

हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे. प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे. हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment