मलकापूरात जनतेच्या आरोग्याशी खेळ तरीही लोकप्रतिनिधी गप्प का? : प्रशांत गावडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मलकापूर शहरालगत असलेल्या हायवेच्या सर्विस रोडला अतिशय धोकादायक पद्धतीने इंटरनेट कंपनीचे काम सुरू आहे. मनमानीपणे पध्दतीने रस्ते उकरणे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशापध्दतीने काम सुरू आहे. मनुष्यवस्तीत प्रचंड मोठ्या कर्णकर्कश आवाजाचा जनरेटर लावून ध्वनिप्रदूषण सुरू आहे. अशा परिस्थितीत मलकापूर नगरपरिषद म्हणते काम आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. तिकडे हायवेकडे तक्रार करा असे सांगितले जात आहे. त्यामुळे नक्की मलकापूरकारांना खुळ्यात कोण काढतयं हेच जनतेला समजेना. तसेच लोकप्रतिनिधी गप्प का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

याबाबत मलकापूरचे पोलिस पाटील प्रशांत गावडे यांनी कराड शहर पोलिस यांना दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मलकापूर शहराच्या हद्दीमध्ये एन्. एच- 4 हायवेकडेच्या सर्व्हिस रस्त्याला एका इंटरनेट कंपनीचे खुदाईकाम सुरु आहे. या कंपनीने रस्ता अतिशय धोकादायक पध्दतीने खुदाई केला असुन, त्याची मुरुम माती इतरत्र तशीच टाकली आहे. यामुळे वाहतुकीची प्रचंड अडचण होत आहे. तसेच या धुळीमुळे हवेचे प्रदुषण व जनरेटरच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनीप्रदुषण होवून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सदरील या हायवे इंटरनेट कंपनीची काम करणाऱ्या कंत्राटदारावर ‘रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे. धुळ व धुराने हवेचे प्रदुषण करणे, तसेच जनरेटरच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदुषण’ केलेबाबत गुन्हा दाखल करावा.

केवळ जनतेला येड्यात काढले जात आहे : प्रशांत गावडे
मलकापूर नगरपरिषद व लोकप्रतिनिधी हे सर्व्हिस रोडचे काम आमच्या हद्दीतील व अधिकारातील नसल्याचे सांगून टोलवत आहे. हायवेकडे अन् ट्राॅफिक पोलिसांकडे बोट दाखवले जात आहे. तेव्हा शहरातील नागरिकांची जबाबदारी घेण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेचे कारभारी हे सक्षम नाहीत. त्यामुळे केवळ लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला असून जनतेला येड्यात काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पोलिस पाटील प्रशांत गावडे यांनी केला आहे.